Connect with us

शैक्षणिक

माॅडेल स्कुल शिंगवे (पारगाव ) शाळेचे पाच विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्र.

Published

on

मंचर-

आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद माॅडेल स्कूल शिंगवे शाळेचे स्वरा महेश झोडगे,सिद्धेश जालिंदर पोंदे,विहान महेंद्र पोखरकर,ऋषिकेश शरद रोडे तसेच रिषभ संजय आहिरे असे सर्वाधिक पाच विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षा २०२६ मध्ये प्रवेश पात्र ठरल्याची माहिती मुख्याध्यापक नवनाथ शिनलकर यांनी दिली.

विविध स्पर्धा परीक्षा,कला,क्रीडा,संगणक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारी जिल्हा परिषद शाळा अशी शाळेची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे.शाळेचे आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती,नवोदय परीक्षेत झळकले आहेत.केंद्रीय जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा २०२६ मध्ये शाळेचे पाच विद्यार्थी प्रवेश पात्र ठरले असून त्या सर्व विद्यार्थ्यांचे यापुढील इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण CBSE बोर्डाच्या केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप,पुणे या ठिकाणी मोफत होणार असल्याची माहिती मार्गदर्शक शिक्षक जालिंदर पोंदे यांनी दिली.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना जालिंदर पोंदे,नवनाथ शिनलकर,अशोक लोखंडे,श्रीकृष्ण डुकरे,सुभाष इंदोरे,विलास भोर,राजेंद्र बोंबे,धनंजय पवार,वैजयंता लोखंडे,संगीता इंदोरे,वर्षा लोंढे,चित्रा पंडित यांनी मार्गदर्शन केले.

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र ठरल्याने विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे पंचायत समिती आंबेगावच्या वतीने गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज,गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका,विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर,शैला निमसे,केंद्रप्रमुख राजू जाधव यांनी तसेच भीमाशंकर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ,सरपंच सीता पवार,उपसरपंच हिरामण गोरडे,संतोष वाव्हळ,चेअरमन दत्ता गोरडे,पोलीस पाटील गणेश पंडित,अध्यक्ष समीर गोरडे, उपाध्यक्ष रेखा पाबळे,वैजनाथ येंधे,रमेश डोके,महेश बांगर,गोरक्षनाथ जगताप,शशी मेहेत्रे,योगेश कासार,समर्थ पंडीत तसेच पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

भीमाशंकर कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा.

Published

on

मंचर-

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक साखरशाळेत शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पुणे जिल्हा परिषद नवनिर्वाचित जिल्हा परिषद .चे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या असून त्यासाठी तब्बल २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.


(कारखाना ) परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शाळेत वर्गखोल्यांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळा एकाच वर्गात अनेक विद्यार्थ्यांना बसवावे लागत होते, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर विवेक वळसे पाटील यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला. मंजूर निधीतून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना स्वतंत्र व सुसज्ज इमारती मिळाल्याने शिक्षण सहज सुलभ होणार आहे त्यामुळे ऊसतोड मजुरात समाधान पसरले आहे .
याबाबत माहिती देताना भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “ऊस कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
या निर्णयाचे शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी स्वागत केले असून लवकरात लवकर वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Continue Reading

शैक्षणिक

न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेच्या विद्यार्थिनीं करीता १३ सायकलचे मोफत वाटप. सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, मुंबई व ॲटलास कार्पो ग्रुप, स्वीडन यांचे सहकार्य.

Published

on

मंचर –
न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेच्या विद्यार्थिनीं करीता १३ सायकलचे मोफत वाटप. सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, मुंबई व ॲटलास कार्पो ग्रुप, स्वीडन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.

कडुस ता. खेड येथील पंढरी लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या इ. ८ वी च्या १३ विद्यार्थिनीना शाळेतील सायकल बँक साठी १३ सायकल मोफत मिळाल्यात. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे , उपाध्यक्ष प्रदीप रोडे पाटील, १३ विद्यार्थिनी, उपशिक्षिका कल्पना राजगुरु , मुख्याध्यापक अनिल देसले, मनोज पाटील यांनी सायकल स्वीकारल्यात.
यावेळी सीएफटीआयचे प्रमुख श्री देशपांडे यांनी विद्यार्थिनींना शाळेत येण्या-जाण्यासाठी पुढील काळात अजून भरीव मदत करणार असे आश्वासन दिले. शाळेतील विद्यार्थिनींसाठी पुढील काळात अजून सायकल देऊ असे ॲटलास कार्पोचे अधिकारी यांनी नमूद केले. शाळेत सुमारे सात ते आठ फाउंडेशन संलग्न करून विद्यार्थ्यांना नवीन नवीन शैक्षणिक सुविधा उभारत आहोत. यात पुन्हा एक सीएफटीआय फाउंडेशन ची भर पडली व पुढील काळात अजून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करू असे मुख्याध्यापक अनिल देसले यांनी सांगितले.

Continue Reading

शैक्षणिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप गणेशनगर काठापुर बुद्रुक येथे आठवडी बाजाराचे आयोजन.

Published

on

मंचर-

विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाचे धडे मिळावेत यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप गणेशनगर काठापुर बुद्रुक येथे आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी या आठवणी बाजारात सहभाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारची खरेदी विद्यार्थ्यांकडून केली.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथील झाप गणेशनगर शाळेमध्ये आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालेभाज्या, फळे, किराणा साहित्य, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. मोठ्या प्रमाणावर पालक व ग्रामस्थांनी या पदार्थांची खरेदी केली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष सचिन नरे,माजी उपसरपंच विशाल करंडे,अरविंद जाधव, सोमनाथ जाधव,रवींद्र करंडे,हौशीराम जाधव, प्रवीण शेटे, स्वप्नील शेटे,मुख्याध्यापक संजय घोटकर वि.गो.साळवे,सिमा बानखेले, संध्या करंडे,वर्षा जाधव उपस्थित होते.

Continue Reading
Advertisement

Trending