सामाजिक
न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या विद्यार्थिनींना रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/01/1001343148-1000x600.jpg&description=न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या विद्यार्थिनींना रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/01/1001343148-1000x600.jpg&description=न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या विद्यार्थिनींना रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">

मंचर-
राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेत राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने नांदी फाउंडेशन, पुणे च्या प्रोजेक्ट नन्हीकली योजने अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थिनींना रक्कम रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे किटस् चे मोफत वाटप मुख्याध्यापक अनिल देसले व निर्देशक लक्ष्मी बोंबे यांचे हस्ते करण्यात आले.

यात शूज, सॉक्स, टी-शर्ट, वही, पेन, व आवश्यक ते सर्व साहित्य नांदी फाउंडेशन पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस व थ्री एम्स यांच्या विशेष आर्थिक योगदानातून शाळेतील मुलींना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती. नांदी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी वर्षा चौधरी यांनी दिली. यावेळी विद्यार्थिनींचे मनोगते झाली.यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.

गावागावातुन
तीन पिढ्यांचा एकत्रित रक्षाबंधन सोहळा
मंचर प्रतिनिधी :
गावडेवाडी येथे पाटील परिवार यांनी यंदाचा रक्षाबंधन सोहळा तीन पिढ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला. आजी-आजोबा, आई-वडील आणि मुले अशा तीन पिढ्या एकत्र आल्याने घरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी या कुटुंबातील आत्या, मुली आणि आताच्या नाती यांनी भावांना प्रेमाने राखी बांधली. आजी-आजोबांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे संस्कार आणि भावंडांचे प्रेम यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र भोजन करून आनंदाचे क्षण साजरे केले.
“तीन पिढ्यांना जोडणारा हा सुंदर बंध म्हणजे रक्षाबंधन!” या भावनेने साजरा झालेला हा सोहळा कुटुंबातील प्रेम, एकता आणि संस्कारांचे सुंदर उदाहरण ठरला.
सामाजिक
पोंदेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू.बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा.संदीप पोखरकर यांची मागणी.
मंचर-
पोंदेवाडी ता. आंबेगाव या ठिकाणी पहाटेच्या वेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून. या परिसरात वारंवार बिबट्या दिसत असून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी पोंदेवाडी चे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.
सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये बिबट्या वारंवार पहावयास मिळत आहे.सध्या ऊस हा डोक्यापेक्षा जास्त उंचीचा झाल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा निर्माण झाली आहे. त्यामुळे एकंदरीत पुन्हा एकदा बिबट्याने आपला मोर्चा उसाच्या परिसरात वळवल्याचे दिसुन येते.
पोंदेवाडी येथील रोडेवस्ती या ठिकाणी आनंदा बबन पोंदे यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने पहाटेच्या वेळी हल्ला करून त्याला ठार केले.सदर वासरू बांधलेले असल्याने बिबट्याला ते वासरू घेऊन जाता आले नाही. त्यामुळे त्याच ठिकाणी वासराचा फडशा पाडला.पहाटे चारच्या दरम्यान आनंदा पोंदे हे जागे झाले असता वासरू व्यवस्थित बसले होते. परंतु सकाळी पाहिले असता वासराला बिबट्याने ठार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर घटनेची माहिती खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांना दिली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी संपर्क साधुन मृत वासराचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
रोडेवस्ती येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.रात्री नऊच्या दरम्यान बिबट्या या परिसरात दिसून आला होता.त्यामुळे हा बिबट्या या ठिकाणी स्थायिक असून दोन बिबटे जोडीने फिरत असल्याचे या बिबट्यांचा बंदोबस्त व्हावा अशी माघणी माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.
गावागावातुन
पोंदेवाडी येथील मखर पडवळवस्ती रस्ता खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चाने केला दुरुस्त.
मंचर-
मागील अनेक दिवसापासून आंबेगाव तालुका चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत असून या पावसामुळे अनेक गावचे रस्ते खराब झाले असून.पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील मखर पडवळवस्ती हा रस्ता खराब झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीचे मागणी स्थानिक ग्रामस्थ करत होते.या माघनी नुसार खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त केला असून त्यामुळे मखर पोखरकरवस्तीकडे जाणाऱ्या नागरिकांना होणारा अडथळा दूर झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून राज्यभरात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आंबेगाव तालुक्यातही चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे.पोंदेवाडी गावातही या पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत.पोंदेवाडी येथील मखरवस्ती पडवळवस्ती हा रस्ता पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. हा रस्ता मातीचा असल्याने यावर खड्डे पडले होते तसेच पाणीही साचले होते.त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास होत होता. म्हणून येथील नागरिकांनी सदर रस्त्याची बाबत अडचण खरेदी विक्री संघाचे माझी अध्यक्ष अनिल वाळूंज यांना सांगितली.

सध्या राज्यातील एकुण ग्रामपंचायी पैकी अनेक ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक असल्याने अनेक विकास कामे करण्यासाठी वेळ जात आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चाने जवळपास दीड लाख रुपये खर्च करून ट्रॅक्टर डंपर जेसीबीच्या साह्याने रस्ता दुरुस्त केला. त्यामुळे येथील नागरिकांनी जाणे येण्याची सोय झाली असून नागरिकांनी रस्ता दुरुस्त झाल्याने दोन्ही व्यक्तींचे आभार मानले आहे.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन11 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
