राजकीय
माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे दोन ते अडिच कोटी महिलांना होनार लाभ.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/08/1000932194.jpg&description=माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे दोन ते अडिच कोटी महिलांना होनार लाभ.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/08/1000932194.jpg&description=माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे दोन ते अडिच कोटी महिलांना होनार लाभ.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर प्रतिनिधी
माझी लाडकी बहिन योजना महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. येथील लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा विश्वास आहे.दोन ते अडीच कोटी महिला भगिनींना या योजनेचा फायदा होणार आहे.ही योजना महिलांना सबल आणि सक्षम करण्यासाठी सुरू राहील. आंबेगाव शिरुरला दिलीप वळसे पाटील यांचे नेतृत्व मिळाले आहे.ते विधिमंडळात अतिशय यशस्वी जबाबदारी पार पाडतात असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले.
मंचर (तालुका आंबेगाव ) या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनसंकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित दादा पवार बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सुरेश घुले, मानसिंग पाचुंदकर, लतीफभाई तांबोळी, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा,भिमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,जिल्हा परिषदेचे माझी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील,पुर्वा वळसे पाटील,विष्णुकाका हिंगे,अंकीत जाधव,निलेश थोरात यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित दादा पवार म्हणाले की 34 वर्षात दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगावचा कायापालट झाला आहे.त्यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध संस्था उभ्या राहिल्या आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये उर्वरित प्रश्न सोडवले जातील.कळमोडीचे, म्हाळसाकांत ,शिरूर तालुक्यातील बारा गावांसाठी पाणी योजना होईल. आदिवासी भागातील गावांसाठी ही पाणी योजना करण्यात येईल .डिंभे चा बोगदा जुन्नर आंबेगावच्या हिताचे जे असेल त्यानुसार केला जाईल. सध्या आम्ही फक्त विकासाच बोलायचं ठरवलं आहे.विरोधक काही म्हणतात परंतु काही म्हणून प्रश्न सुटत नाही. एखादा कार्यकर्ता सर्व गुणसंपन्न होण्यासाठी 25 ते 30 वर्षे काम करावे लागते. आम्ही ते केलं शिव, शाहू, फुले विचारधारा पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही चाललो आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब संविधान बदलणार अशा वावड्या उठवल्या परंतु तसं नाही संविधान बदलल जानार नाही. मोदी साहेब संविधानाचा आदर करतात .चुकीची माहिती पसरवून गैरसमज निर्माण केला जातो. मी शब्दाचा पक्का आहे .जे झालं ते झालं इथून पुढे आपण सर्वांनी आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभ राहिले पाहिजे हि विनंती करतो.महिलांचे खूप मोठे प्रेम आम्हा सर्वांना मिळत आहे. महिला बालकल्यान मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांसाठी पैशाची मागणी केल्यानंतर सक्षग हजार कोटीच्या फाईलवर सही करून ते पैसे वर्ग केले. एक कोटी आठ लाख महिलांच्या खात्यावर पैसे गेले आहेत .रक्षाबंधन आधी दीड कोटी महिलांच्या खात्यावर सन्मान निधी हस्तांतरीत होईल.शेतकऱ्यांनसाठी साडेसात एचपी मोटर पर्यंत लाईट बिल माफ केले आहे व ते इथून पुढे माफ केले जाईल. पुढच्या सात ते आठ महिन्यात दिवसा विज देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .माघेल त्याला सोलर पंप दिला जाईल. आंबेगाव शिरुर चे नेतृत्व सक्षम आहे. राज्यातील सर्वाधिक लीड एक नंबरच लीड या निवडणुकीत आपण वळसे पाटलांना दिले पाहिजे असे यावेळी अजित दादा पवार म्हणाले.
राजकीय
डिंभे-माणिकडोह बोगद्यास विरोध कायम; आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही! माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्ट मत; मा. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडली भूमिका
मंचर –
मुंबई येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुकडी प्रकल्पाच्या रु. ५७०४.५० कोटी रुपयांच्या प्रस्तावास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) देण्यात आल्याचे समजते. या सुधारित मान्यतेमध्ये मूळ कुकडी प्रकल्पात समाविष्ट नसलेल्या डिंभे-माणिकडोह या बोगद्याचा समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या निर्णयाची तातडीने दखल घेत आमदार दिलीप वळसे पाटील यांनी लागलीच मुख्यमंत्री महोदयांची प्रत्यक्ष भेट घेऊन या बोगद्याबाबत आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील जनतेचा व शेतकऱ्यांचा असणारा तीव्र विरोध मा. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.
या भेटीदरम्यान मा. वळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, सदर बोगद्यामुळे या परिसरातील शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. तसेच दिनांक १८ जुलै २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री (कै. अजितदादा पवार) यांच्या समवेत व मा. वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत डिंभे-माणिकडोह बोगदा न करण्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन या प्रसंगी निर्दर्शनास आणुन दिले. या सर्व बाबी लक्षात आणून देत मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयामध्ये आवश्यक ते बदल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या संदर्भातील निवेदन/पत्र मा. मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष सुपूर्द करण्यात आले.
वळसे पाटील यांच्या भूमिकेची दखल घेत मा. मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये बदल करण्याचे आणि आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ न देण्याचे आश्वासन दिले आहे.
राजकीय
भेसळप्रकरणात संबंध आढळल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन’ – दिलीप वळसे पाटील यांचा विरोधकांना थेट इशारा.
मंचर:
अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) दुधाच्या व्यवसायावर केलेल्या कारवाईवरून सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीवर आंबेगावचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर प्रकरणात आपला दूरान्वयानेही संबंध सिद्ध झाला, तर एका मिनिटाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन, असे खुले आव्हान त्यांनी राजकीय विरोधकांना दिले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे विरोधकांच्या खोट्या आरोपांचा कडक शब्दांत समाचार घेतला.
गेल्या काही दिवसांपासून एफडीएच्या माध्यमातून राज्यात आणि अंबेगाव तालुक्यात दूध व्यावसायिकांवर तपासणी करून कारवाई केली जात आहे. ही कारवाई अजूनही सुरूच आहे. मात्र, ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही, त्या गोष्टींशी आपले नाव जोडून आपली राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न काही राजकीय विरोधकांकडून जाणीवपूर्वक केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भेसळ करणारी कोणतीही व्यक्ती, कंपनी किंवा संस्था असो, आपण कधीही कोणाच्याही पाठीशी उभा राहणार नाही, असे सांगत एफडीए आणि पोलीस प्रशासन अशा लोकांवर कडक कारवाई करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्यावर खोटे-नाटे आरोप करून राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. विरोधकांनी ही खोडसाळ बदनामी त्वरित थांबवली नाही, तर त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात (High Court) फौजदारी (Criminal) आणि मोठ्या आर्थिक अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा थेट इशारा त्यांनी दिला. आपण नेहमीच स्वच्छ आणि पारदर्शक राजकारण केले असून जनता, समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांनी या राजकीय षड्यंत्राची नोंद घ्यावी, असे आवाहन करत शेवटी सत्याचाच विजय होईल, असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
राजकीय
काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली.
मंचर-
सध्या देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. यावेळी शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शालेय मुख्यमंत्री पदासाठी दोन उमेदवार उभे होते.तर वर्गानुसार उमेदवार उभे होते. सहावी इयत्तेतुन दोन जागेसाठी चार विद्यार्थी उभे होते. पाचवी इयत्तेतुन दोन जागेसाठी पाच विद्यार्थी उमेदवार उभे होते. चौथी मध्ये एका जागेसाठी तीन, तिसरी मध्ये एका जागेसाठी चार तर दुसरी मध्ये एका जागेसाठी सहा विद्यार्थी उमेदवारांनी निवडणूक लढवली.
यावेळी फोटो सहित विद्यार्थ्यांची मतदार यादी तयार करण्यात आली होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदार यादीतील नावासमोर सही करुन डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून मतदानाचा हक्क बजावता. यावेळी मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आले. मतदान केंद्रामध्ये एक मतदार केंद्र अधीकारी, तीन मतदान अधिकारी,दोन उमेदवार प्रतिनिधी यांनी निवडणुकीचे काम पाहिले.
यावेळी दोन ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदान कक्ष बनवण्यात आले होते. मतदार केल्यावर एका ठिकाणी मतदान पेटित मतपत्रिका विद्यार्थ्यांनी टाकल्या.
या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, शिक्षक उत्तम वाव्हळ, नीलिमा वळसे पाटील, कविता कोठावळे,मुक्ता कौसे,प्राची शिंदे यांनी माहिती देऊन भारतीय लोकशाहीसाठी मतदान किती महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे असे सांगितले.
यावेळी मतदान झालेल्या मतपत्रिकांवरील मतांची मोजणी होऊन उभ्या राहिलेल्या उमेदवारांमधून विजयी उमेदवारांमधून मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन12 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
