गावागावातुन
घोडनदीवर लाखनगाव येथे पुलावर ट्रक आदळल्याने वाहतुकीस अडथळा.
निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे
लाखनगाव (ता.आंबेगाव येथील) घोड नदी वरील पुलावर बेल्हा जेजुरी महामार्गावर बेल्ह्याच्या बाजूने येऊन जेजुरीच्या बाजूकडे जाणारा मोठा ट्रक पुलाच्या कठड्याला धडकल्याने अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.
लाखनगाव येथील पुल लहान असल्याने दुसरं वाहन या ठिकाणा वरून जात नसल्याने अनेक वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वेकडील लाखनगाव आणि शिरूर तालुक्यातील पश्चिमेकडून चांडोह या दोन गावांच्या मध्ये घोड नदीवर जुना पूल आहे.हा पुल रुंदीने व उंचीने लहान आहे. पूर्वी या ठिकाणाहून अत्यंत कमी वाहतूक होत होते .त्यामुळे या फुलावरून वाहनांची एजा सुरू असायची. जास्त अतिवृष्टी झाल्यानंतर वाहतूक बंद असायची. परंतु सध्या या ठिकाणाहून बेल्हा जेजुरी महामार्ग तयार झाला आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने तसेच औद्योगिक क्षेत्राशी निगडित वाहतूक या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या ठिकाणी सध्या नवीन उंच व रुंद पुलाचे काम सुरू आहे .परंतु हा पुल अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहन चालकांना जुन्या लहान पुलाचा वापर करावा लागत आहे.

आज सकाळच्या वेळी चांडोह गावाच्या बाजूने येत असलेला मोठा ट्रक हा पुलाच्या जवळ आला असता पाठीमागून येणाऱ्या गाडीने त्याला ओहोरटेक करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे माघील गाडीला जागा करून देत असताना. ट्रक फुलाच्या कढड्यावर आदळुन अपघात झाला. त्यामुळे ट्रक त्याच ठिकाणी बंद झाला. त्यामुळे रुंद असलेले या पुलावरून सुरू असलेली वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या आषाढी एकादशी तसेच सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्याने होत आहे. वाहतूक बंद झाल्याने वाहन चालकांची व स्थानिक ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे.व हा पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा जेणेकरून जुन्या पुलावरून होणारी वाहतूक थांबेल व वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना व ग्रामस्थांना त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे नवीन पुलांचे काम लवकर पुर्ण व्हावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
गावागावातुन
भीमाशंकर कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा.
मंचर-
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक साखरशाळेत शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पुणे जिल्हा परिषद नवनिर्वाचित जिल्हा परिषद .चे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या असून त्यासाठी तब्बल २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

(कारखाना ) परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शाळेत वर्गखोल्यांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळा एकाच वर्गात अनेक विद्यार्थ्यांना बसवावे लागत होते, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर विवेक वळसे पाटील यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला. मंजूर निधीतून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना स्वतंत्र व सुसज्ज इमारती मिळाल्याने शिक्षण सहज सुलभ होणार आहे त्यामुळे ऊसतोड मजुरात समाधान पसरले आहे .
याबाबत माहिती देताना भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “ऊस कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
या निर्णयाचे शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी स्वागत केले असून लवकरात लवकर वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गावागावातुन
काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथे महिलांसाठी उद्यमिता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ.
मंचर-
भारतीय उद्यमिता विकास संस्थान (EDII) आणि अॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे महिलांसाठी “Cold Pressed oil प्रोसेसिंग” या विषयावर 20 दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
हा उपक्रम महिलांना उद्योग कौशल्ये, साधने आणि आत्मविश्वास देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश ठेवतो, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता येईल आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लागेल.
उद्घाटन समारंभात सरपंच अशोक करंडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा गोसावी, सुनील काटे (पंचायत समिती कृषी अधिकारी )आणि ईडीआय प्रोजेक्ट ऑफिसर सचिन मोरे उपस्थित होते.पोलीस पाटील अमोल करंडे.
भारतीय उद्यमिता विकास संस्थान आणि अॅक्सेंचर यांनी पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी संपूर्ण पाठबळ, नाविन्यपूर्ण संधी आणि शाश्वत उद्यमशीलतेची परिसंस्था निर्माण करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे.
गावागावातुन
काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.
मंचर-
महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन6 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
