गावागावातुन
प्रस्तावित पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध.योग्य मोबदला देणार प्रशासनाची भुमिका.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/06/1000580974-739x600.jpg&description=प्रस्तावित पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध.योग्य मोबदला देणार प्रशासनाची भुमिका.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/06/1000580974-739x600.jpg&description=प्रस्तावित पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध.योग्य मोबदला देणार प्रशासनाची भुमिका.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
प्रस्तावित पुणे नाशिक औद्योगिक महामार्गासाठी आंबेगाव,जुन्नर, शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात असून. या महामार्गाबाबत येथील शेतकऱ्यांना योग्य माहिती नव्हती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याबाबत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना या संदर्भात माहिती मिळावी म्हणून संपर्क साधला होता. आणि त्यामुळे नामदार वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार सदर बैठकीचे आयोजन भीमाशंकर कारखान्याच्या कार्यस्थळावर करण्यात आले होते. या महामार्गाबाबत येथील शेतकऱ्यांना चांगल्या स्वरूपाचा मोबदला द्यावा .शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका प्रशासनाने ठेवावी असे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले.

पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी बैठकीचे आयोजन भिमाशंकर कारखाना येथे करण्यात आले होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी (एम.एस. आर.डी.सी.) ए.आर.अरगुंडे, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे,एम.एस.आर.डी.सी.च्या वर्षा पवार, मंचर प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, आंबेगाव तहसीलदार संजय नागटिळक, जुन्नर चे तहसीलदार रविंद्र सबनीस, त्याचप्रमाणे भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील,रामदास वळसे पाटील,अनिल वाळुंज, बाळासाहेब घुले,बाळशीराम वाळूंज,गुरूदेव पोखरकर, अशोक वाळूंज,संदिप पोखरकर ,अशोक करंडे,विशाल करंडे ,कान्हु करंडे,बिपीन थिटे,बाळासाहेब औटी,प्रतिक जाधव,अशोक आदक,सुशांत रोडे, यांसह शिरुर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.

यावेळी एम एस आर डी सी चे अप्पर जिल्हाधिकारी ए.आर.अरगुंडे यांनी या महामार्गाविषयी माहिती दिली. पुणे नाशिक या ठिकाणी वाढत असलेल्या डेव्हलपमेंट मुळे शासनाने सदर मार्ग प्रस्तावित केला असून. शेतकऱ्यांना योग्य स्वरूपाचा मोबदला देण्यात येणार आहे .हा महामार्ग शंभर मीटर रुंदीचा असून येथील शेती व औद्योगिक मालाची वाहतूक करण्यासाठी या महामार्गाचा उपयोग होणार आहे. या महामार्गामुळे येथील शेतकऱ्यांचा विकास होणारा आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांसाठी सर्विस रोड ठेवण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असणाऱ्या वाटा,पायवाटा या ठिकाणी उड्डाणपूल करण्यात येणार आहे.
यामध्ये सहा ठिकाणी या मार्गावर जाण्यासाठी रस्ते ठेवण्यात आले आहेत. 2013 च्या कायद्यानुसार चारपट मोबदला शासन देणार आहे. तसेच महाराष्ट्र हायवे कायद्यानुसार शेतकऱ्यांनी शासनाला सहकार्य केले तर 25% अधिकचा मोबदला मिळणार आहे. त्यामुळे योग्य मोबदला येथील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.तसेच झाडे, विहिरी, बोर, मंदिरे ,गोठे ,घरे, पाईपलाईन या सर्वच गोष्टीसाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना अडीच पट मोबदलाही शासन देणार आहे.जिरायती साठी पाच पट, हंगामी बागायतीसाठी साडेसात पट,बारमाही बागायतीसाठी दहापट मोबदलाही शेतकऱ्यांना मिळणार आहे.प्रत्येक गटाचा मोबदला त्या गटाच्या आकारणीनुसार ठरेल.असेही यावेळी अरगुंडे यांनी सांगितले.
यावेळी या महामार्गाचे समन्वयक उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, यांनीही शेतीमालाला या मार्गाचा उपयोग होणार असून या महामार्गामुळे परिसराचा विकास होणार आहे असे म्हणाले.यावेळी विवेक वळसे पाटील म्हणाले की महामार्गाच्या परिसरात लघु उद्योगांसाठी शासनाने प्रकल्प उभा केला पाहिजे त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यात या महामार्गावर जाण्यासाठी सोय करावी येथील शेतकऱ्यांच्या पाठीमागे नामदार वळसे पाटील कायमच उभे राहतील असे या वेळी विवेक वळसे पाटील म्हणाले.
गावागावातुन
खेड्यापाड्यातही आता मोठ्या गणेश मूर्तींची धूम, आंबेगाव तालुक्यात पीओपीसह शाडूच्या मूर्तीना मागणी; तयारी अंतिम टप्प्यात
मंचर-
येत्या काही दिवसानी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी ओबेगाव तालुक्यात शहर व ग्रामीण भागातील कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती साकारण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. कारागीर दिवस-रात्र मेहनत घेऊन मूर्तीना आकर्षक रूप देत असून, यंदा पीओपीसह पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी असल्याचे जिल्ह्याला घाऊक मूर्ती पुरवणारे गावडेवाडी ता आंबेगाव येथील श्रीधर आप्पा राजगुरू व प्रथमेश श्रीधर राजगुरू यांनी सांगितले आहे.
आंबेगाव तालुक्यातील कारखान्यांमध्ये रंगकाम, सजावट आणि वस्त्रांच्या नक्षीकामाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नैसर्गिक रंगांचा वापर आणि पारंपरिक स्वरूपाच्या मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक मंडळांसह नागरिकांनी आगाऊ नोंदणी (बुकिंग) सुरू केली असून, कारागीर ग्राहकांच्या पसंतीनुसार विशेष मूर्ती साकारत आहेत.कारखान्यात गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला असून, सध्या मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे.
आमच्या कारखान्यात सध्या सुमारे तीन हजार मूर्ती तयार असून, त्या सर्व ग्राहकांच्या पसंतीनुसार बनविल्या आहेत. १० ते २५ हजार रुपये किमतीच्या मोठ्या मूर्तीना मंडळांकडून विशेष मागणी आहे. शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी आहे.घरगुती गणेश मूर्तीनाही मोठी मागणी आहे – प्रथमेश श्रीधर राजगुरू
मूर्ति कारागीरगीरआदर्शगाव गावडेवाडी (ता .आंबेगाव )
पीओपी मूर्तीना पसंतीआकर्षक रंगसंगती
कमीवजन आणि परवडणाऱ्या किमतीमुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीना बाजारात मोठी मागणी आहे. प्रशासनाने पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन केले असले तरी, पीओपीच्या मूर्तीची विक्री वाढणार असल्याचा दावा श्रीधर राजगुरू यांनी केला आहे.मात्र कच्च्या मालाचे वाढलेले दर वाढलेली मजुरी यामुळे यावर्षी मूर्ती विक्रीत १५ ते २० टक्यांनी वाढ होणार असल्याचेही श्रीधर राजगुरू सांगतात दुसरीकडे, पर्यावरणप्रेमींकडूनजलप्रदूषणाबाबत चिंताव्यक्त करत शाडूच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन केले जात आहे

आदर्श गाव गावडेवाडी ता आंबेगाव येथील गणेश मूर्ती कारागीर कारखान्यात अखेरचा हात फिरवण्याच्या लगबगीत गुंतले आहेत
गावागावातुन
पोंदेवाडीत कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी, 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान शेतकरी चिंतेत.
मंचर-
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांच्या कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे झाली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून.सदर घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.या चोरीच्या घटनेमुळे कांदा साठवणूक केलेले शेतकरी चिंतेत आहेत.
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांची कांद्याची बराकी ही काठापूर पोंदेवाडी गावांच्या शिवेला डिंभा उजवा कालव्याच्या बाजूला आहे.या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही त्यामुळे या ठिकाणी रात्री काही घटना घडली तर कुणाला कळत नाही.
याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे केली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने.एक पिशवी कांद्याला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे सध्या घरापासून दूर अंतरावर असणाऱ्या कांदा बराकींमधून कांद्याची चोरी होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

त्यामुळे एकांटी असणाऱ्या कांदा वखारीतील कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पोंदेवाडी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.
सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरीच्या भितीने शेतकरी धास्तावला असुन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले.
गावागावातुन
तीन पिढ्यांचा एकत्रित रक्षाबंधन सोहळा
मंचर प्रतिनिधी :
गावडेवाडी येथे पाटील परिवार यांनी यंदाचा रक्षाबंधन सोहळा तीन पिढ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला. आजी-आजोबा, आई-वडील आणि मुले अशा तीन पिढ्या एकत्र आल्याने घरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी या कुटुंबातील आत्या, मुली आणि आताच्या नाती यांनी भावांना प्रेमाने राखी बांधली. आजी-आजोबांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे संस्कार आणि भावंडांचे प्रेम यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र भोजन करून आनंदाचे क्षण साजरे केले.
“तीन पिढ्यांना जोडणारा हा सुंदर बंध म्हणजे रक्षाबंधन!” या भावनेने साजरा झालेला हा सोहळा कुटुंबातील प्रेम, एकता आणि संस्कारांचे सुंदर उदाहरण ठरला.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन11 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
