गावागावातुन
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिरदाळे येथे फळझाडांचे वृक्षारोपण.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
शिरदाळे ( ता. आंबेगाव ) येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनविभाग व ग्रामपंचायत शिरदाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा, जांभळ, वड आदी फळझाडांचे वृक्षारोपण शिरदाळेच्या तलाव परिसरात करण्यात आले.
यावेळी धामणी वनपरिक्षेत्राच्या वनपाल सोनाली भालेराव व,पारगाव पोलीस स्टेशनचे वाफगावकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम राबवत असताना शिरदाळे ग्रामस्थांकडुन पावसाळा सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणार असल्याचे शिरदाळे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी मा.सरपंच मनोज तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे,पूजा पवार, दिलीप वाघ,मा.उपसरपंच सुभाष तांबे,अनिकेत चौधरी, महादू सरडे,बबन रणपिसे,जया रणपिसे,पूजा सरडे,योगिता तांबे,सीमा तांबे,राज तांबे उपस्थित होते.
शिरदाळे गावाला कायमच वनविभागाचे मोलाचे सहकार्य असते. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अयोजिक करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. गावातील तरुण सहकाऱ्यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या ग्रुप अंतर्गत एकत्र येऊन भविष्यात वृक्षलागवड करण्यात येणार असून उन्हाळ्यात देखील पक्षांसाठी खाद्य ठेवण्याची उपक्रम केला होता. पावसाळ्यात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा तरुणांचा प्रयत्न असणार आहे.
मयुर सरडे
(मा.उपसरपंच शिरदाळे)
गावागावातुन
जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.
मंचर-
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत.
निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
गावागावातुन
शिळा बाजार” ठरतोय वळती गावच्या सांस्कृतिक ओळखीचा भागयंदा शिळ्या बाजारात झाली लाखोंची उलाढाल.
पारगाव :
वळती (ता.आंबेगाव) गावात स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली शिळ्या बाजाराची ही परंपरा पिढ्यान्पिढ्या जपत ग्रामस्थांनी आजपर्यंत टिकवून ठेवली आहे. आधुनिक काळातही गावच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असलेला हा शिळा बाजार वळती गावाची खास ओळख ठरत आहे. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक सलोखा जपत भरवला जाणारा हा शिळा बाजार पाहण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिकही आवर्जून उपस्थित राहत आहेत.

पौष पौर्णिमेला नागापूर येथील थापलिंग गडावर दोन दिवस खंडोबा देवाची यात्रा भरते. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी वळती गावात हा शिळा बाजार भरतो. पूर्वीचा काळी वळती, नागापूर या दोन गावांची वळती ग्रामपंचायत एकच होती. त्यामुळे थापलिंग देवस्थान हे वळती ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत होते. त्यावेळी वळती गावापासून थापलिंग देवस्थान हे तीन चार किलोमीटर अंतरावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना यात्रेला जाण्यासाठी कठीण होते. वळती गावातील काटवान वस्ती, गांजवेवाडी या परिसरातून थापलिंग देवस्थान दूरच्या अंतरावर होते. त्यामुळे थापलिंग गडावर जाण्यापासून अनेक जण वंचित राहत होते. यात्रेकरूंची ही गैरसोय टाळण्यासाठी थापलींग गडावरची जिलेबी भजी, शेव रेवडीची हॉटेल , खेळणी, बांगड्यांची दुकाने ही वळती गावात तिसऱ्या दिवशी येऊ लागली. त्यामुळे हा शिळा बाजार सुरू झाला. तेव्हापासून आजपर्यंत हा बाजार मोठ्या उत्साहात भरतो. आहिल्यानगर, बीड जिल्ह्यातील व्यावसायिक येथे दरवर्षी आवर्जून येतात. या बाजारात महिलांची लहान मुलांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
यंदा पै पाहुण्यांना ग्रामस्थांनी जिलेबी -, शेव -रेवडी आग्रहाने खाऊ घातली. महिलांनी संसारपयोगी साहित्य वस्तू खरेदी केल्या. या शिळ्या बाजारात यंदा लाखो रुपयांची उलाढाल झाली.
चौकट : वळती गावात थापलिंग यात्रेचा उत्साह अधिक: थापलिंग यात्रेचा उत्साह वळती गावात पूर्वीपासून अधिकच दिसून येतो. आजही आपली गडावर ओळखीच्या काठी पालख्यांना मोठा मान दिला जातो. सर्व मुंबई, पुणेकर मंडळी आवर्जून या यात्रेसाठी हजेरी लावतात.

वळती (ता. आंबेगाव) गावात शिळ्या बाजाराची आजही परंपरा टिकून आहे.
गावागावातुन
थापलिंग देवस्थान विकासासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार: माजी मंत्री दिलीप वळसे पाटील
पारगाव :
श्री. क्षेत्र थापलिंग देवस्थान विकासासाठी या पूर्वकाळात मी आमदार निधी, तीर्थक्षेत्र विकास निधी उपलब्ध करून दिला. त्यातून थापलिंग गडावर विविध विकास कामे झाली. थापलिंग देवस्थान विकासासाठी जाहीर केल्याप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भागविकास निधीतून ५० लाख रुपयांचा निधी थापलिंग देवस्थान ट्रस्टकडे वर्ग केला आहे. पुढच्या यात्रेपर्यंत आणखी ५० लाख रुपयांचा निधी मी राज्यशासन, इतर निधीतून उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि.४) दिली.
नागापूर (ता.आंबेगाव) येथील श्री.क्षेत्र थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आमदार दिलीप वळसे पाटील यांनी खंडोबा देवाचे दर्शन घेऊन तळीभंडार केला. त्यानंतर बैलगाडा घाटात गेल्यावर यात्रेकरूंना शुभेच्छा देताना वळसे पाटील बोलत होते.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले”मी भाग्यवान आहे. लहानपणापासून थापलिंग यात्रेला मला येण्याची संधी मिळाली. गेल्या वर्षी यात्रेत थापलिंग देवस्थान विकास कामांसाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भागविकास निधीतून ५० लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. भीमाशंकर कारखान्याने थापलींग देवस्थान ट्रस्टकडे हा निधी वर्ग केला आहे. थापलिंग गडावर आणखी विकास कामांसाठी मोठ्या निधीची गरज आहे. पुढच्या यात्रेपर्यंत आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आणखी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहोत. याशिवाय थापलिंग देवस्थानासाठी जेव्हा जेव्हा जी मदत लागेल. ती मदत प्राधान्याने केली जाईल.
याप्रसंगी थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने वळसे पाटील यांचा सत्कार देवस्थान ट्रस्टचे सचिव डी. एन. पवार यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी विष्णू काका हिंगे भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, सचिन भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य तुलसी भोर, पंचायत समितीच्या माजी सभापती उषा कानडे, अंकिता वाळुंज, सुनंदा ढोबळे आदी मान्यवर, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सरपंच गणेश यादव यांनी केले.

नागापूर (ता.आंबेगाव) येथील श्री. थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन5 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
