गावागावातुन
उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मनुष्य वस्तीकडे,पाण्याच्या शोधात आलेल्या मोरांला ग्रामस्थ करतात अन्य पाण्याची सोय.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/04/1000478383-830x600.jpg&description=उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मनुष्य वस्तीकडे,पाण्याच्या शोधात आलेल्या मोरांला ग्रामस्थ करतात अन्य पाण्याची सोय.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/04/1000478383-830x600.jpg&description=उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मनुष्य वस्तीकडे,पाण्याच्या शोधात आलेल्या मोरांला ग्रामस्थ करतात अन्य पाण्याची सोय.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर प्रतिनिधी
पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथे मोठ्या प्रमाणावर मोरांचे वास्तव्य आहे. सध्या उन्हाची तिव्रता वाढली असून पाण्याची कमतरता जानवत आहे.असाच पाण्याच्या शोधात आलेल्या एका मोराला माधुरी प्रकाश ( पप्पू ) दौंड या महिलेने पाणी पाजून आपले वन्यजीवांप्रती कर्तव्य पार पाडले.
पोंदेवाडी गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर मोरांचे वास्तव आहे.यातील एक मोर पाण्याच्या शोधात होता.पाण्यावाचुन कासावीस झाला मोर माधुरी प्रकाश दौंड या महिलेच्या जवळ आला.या मोराला पाण्याची गरज आहे हे लक्षात येताच.दौंड यांनी या मोराला पाणी पाजले. पाणी पिल्यानंतर पुन्हा हा मोर निसर्गाच्या सान्निध्यात निघुन गेला.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात जारकरवाडी, धामणी खिंड, पोंदेवाडी काठापुर आदी गावांमध्ये मोरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.
या परिसरातून डिंभे धरणाचा
उजवा कालवा गेल्याने परिसरात चारा, पाणी उपलब्ध होत असते. या परिसरात मोर मोठ्या प्रमाणात आढळुन येत आहे. या भागातील काही शेतकरी मोरांना खाण्यासाठी धान्य उपलब्ध करून देत आहेत.त्यामुळे सकाळी अथवा संध्याकाळी पारगाव लोणी रस्त्यावर किंवा लोणी पोंदेवाडी रस्त्यावर मोरांच्या थव्यांचे दृश्य पहावयास मिळत आहे.
परंतु सध्या उन्हाची तिव्रता वाढली असुन अन्न व पाण्याची कमतरता जानवते त्यामुळे सध्या मोर मनुष्य वस्तीकडे येत आहेत. त्यामुळे या मोरांना अन्न व पाण्याची याची सोय करणे गरजेचे बनले आहे.
गावागावातुन
खेड्यापाड्यातही आता मोठ्या गणेश मूर्तींची धूम, आंबेगाव तालुक्यात पीओपीसह शाडूच्या मूर्तीना मागणी; तयारी अंतिम टप्प्यात
मंचर-
येत्या काही दिवसानी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी ओबेगाव तालुक्यात शहर व ग्रामीण भागातील कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती साकारण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. कारागीर दिवस-रात्र मेहनत घेऊन मूर्तीना आकर्षक रूप देत असून, यंदा पीओपीसह पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी असल्याचे जिल्ह्याला घाऊक मूर्ती पुरवणारे गावडेवाडी ता आंबेगाव येथील श्रीधर आप्पा राजगुरू व प्रथमेश श्रीधर राजगुरू यांनी सांगितले आहे.
आंबेगाव तालुक्यातील कारखान्यांमध्ये रंगकाम, सजावट आणि वस्त्रांच्या नक्षीकामाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नैसर्गिक रंगांचा वापर आणि पारंपरिक स्वरूपाच्या मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक मंडळांसह नागरिकांनी आगाऊ नोंदणी (बुकिंग) सुरू केली असून, कारागीर ग्राहकांच्या पसंतीनुसार विशेष मूर्ती साकारत आहेत.कारखान्यात गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला असून, सध्या मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे.
आमच्या कारखान्यात सध्या सुमारे तीन हजार मूर्ती तयार असून, त्या सर्व ग्राहकांच्या पसंतीनुसार बनविल्या आहेत. १० ते २५ हजार रुपये किमतीच्या मोठ्या मूर्तीना मंडळांकडून विशेष मागणी आहे. शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी आहे.घरगुती गणेश मूर्तीनाही मोठी मागणी आहे – प्रथमेश श्रीधर राजगुरू
मूर्ति कारागीरगीरआदर्शगाव गावडेवाडी (ता .आंबेगाव )
पीओपी मूर्तीना पसंतीआकर्षक रंगसंगती
कमीवजन आणि परवडणाऱ्या किमतीमुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीना बाजारात मोठी मागणी आहे. प्रशासनाने पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन केले असले तरी, पीओपीच्या मूर्तीची विक्री वाढणार असल्याचा दावा श्रीधर राजगुरू यांनी केला आहे.मात्र कच्च्या मालाचे वाढलेले दर वाढलेली मजुरी यामुळे यावर्षी मूर्ती विक्रीत १५ ते २० टक्यांनी वाढ होणार असल्याचेही श्रीधर राजगुरू सांगतात दुसरीकडे, पर्यावरणप्रेमींकडूनजलप्रदूषणाबाबत चिंताव्यक्त करत शाडूच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन केले जात आहे

आदर्श गाव गावडेवाडी ता आंबेगाव येथील गणेश मूर्ती कारागीर कारखान्यात अखेरचा हात फिरवण्याच्या लगबगीत गुंतले आहेत
गावागावातुन
पोंदेवाडीत कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी, 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान शेतकरी चिंतेत.
मंचर-
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांच्या कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे झाली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून.सदर घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.या चोरीच्या घटनेमुळे कांदा साठवणूक केलेले शेतकरी चिंतेत आहेत.
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांची कांद्याची बराकी ही काठापूर पोंदेवाडी गावांच्या शिवेला डिंभा उजवा कालव्याच्या बाजूला आहे.या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही त्यामुळे या ठिकाणी रात्री काही घटना घडली तर कुणाला कळत नाही.
याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे केली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने.एक पिशवी कांद्याला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे सध्या घरापासून दूर अंतरावर असणाऱ्या कांदा बराकींमधून कांद्याची चोरी होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

त्यामुळे एकांटी असणाऱ्या कांदा वखारीतील कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पोंदेवाडी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.
सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरीच्या भितीने शेतकरी धास्तावला असुन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले.
गावागावातुन
तीन पिढ्यांचा एकत्रित रक्षाबंधन सोहळा
मंचर प्रतिनिधी :
गावडेवाडी येथे पाटील परिवार यांनी यंदाचा रक्षाबंधन सोहळा तीन पिढ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला. आजी-आजोबा, आई-वडील आणि मुले अशा तीन पिढ्या एकत्र आल्याने घरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी या कुटुंबातील आत्या, मुली आणि आताच्या नाती यांनी भावांना प्रेमाने राखी बांधली. आजी-आजोबांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे संस्कार आणि भावंडांचे प्रेम यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र भोजन करून आनंदाचे क्षण साजरे केले.
“तीन पिढ्यांना जोडणारा हा सुंदर बंध म्हणजे रक्षाबंधन!” या भावनेने साजरा झालेला हा सोहळा कुटुंबातील प्रेम, एकता आणि संस्कारांचे सुंदर उदाहरण ठरला.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन11 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
