Connect with us

गावागावातुन

मांदळेवाडी येथे खंडित होत असलेल्या विजपुरवठा होनार सुरळीत.नविन विज लाईनचे काम सुरू.

Published

on

.

मंचर-

मांदळेवाडी ता.आंबेगाव येथे गावाला होनारा विजपुरवठा हा शिरुर तालुक्यातुन होत असल्याने तो वारंवार खंडित होत होता.त्यामुळे येथील ग्रामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.यावर उपाय म्हणून या गावाला आता वडगावपीर येथुन विजपुरवठा करण्याचे काम सुरू असुन या कामाची सुरुवात करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून मांदळेवाडी ता.आंबेगाव येथे होनारा विजपुरवठा हा वारंवार खंडित होत होता.आंबेगाव तालुक्यातील या शेवटच्या गावाला शिरुर तालुक्यातुन विद्युत पुरवठा होत होता. परंतु त्या ठिकाणी असणारे लोड शेडिंग हे दररोज संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत होत होते, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ वैतागले होते.या नागरिकांनी बरेच दिवसांपासून मागणी केली होती की आम्हाला विद्युत पुरवठा आंबेगाव तालुक्यातून लोणी उपकेंद्रातून मिळावा.याबाबद स्थानिक ग्रामस्थांनी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज,यांच्याकडे पाठपुरावा करत होते.या मागणीचा विचार करून मांदळेवाडी गावास विद्युत पुरवठा वडगाव पीर या गावापासून मांदळेवाडी पर्यंत नेण्यासाठी जवळपास 50 पोलची विद्युत लाईनमंजुर होऊन या कामाला सुरुवात करण्यात आली.यासाठी अंदाजे 25 लाख रुपयेचा निधी लागणार आहे.या कामाचे भूमिपूजन पंचायत समिती सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज व खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,संविदने गावचे माजी सरपंच वसंत पडवळ, मांदळेवाडी गावच्या सरपंच उज्वला आदक,विजू आदक, बाळशीराम वाळुंज, प्रतिक जाधव पाटील, चेतन पडवळ उपस्थितीत होते.यासाठी रामदास वळसे पाटील यांनी पाठपुरावा केला.त्यामुळे येणाऱ्या आठ ते दहा दिवसात मांदळेवाडी ग्रामस्थांचा विज पुरवठा सुरळीत होनार आहे.स्थानिक ग्रामस्थांना पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा होणार आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

शिवपुराण कथा सोहळ्याला नागरीकांची गर्दी.ज्ञानेश महाराव फलके कथा प्रवक्ते.

Published

on

मंचर-

काठापुर बुद्रुक ता. आंबेगाव येथील भोकरवाडी मध्ये सुरू असलेल्या शिवपुराण संगीतमय कथा सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असून. ह भ प ज्ञानेश महाराव फलके आमोंडी यांच्या माध्यमातून ही कथा सांगितले जाता आहे.कथा ऐकण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर जमत आहेत.

काठापुर बुद्रुक ता. आंबेगाव येथील भोकरवाडी गणेशनगर मध्ये दरवर्षी संगीत कथा सोहळ्याचे आयोजन केले जाते याही वर्षी ह भ प ज्ञानेश महाराव फलके आमोंडी यांच्या शिवपुराण या कथासोळ्याचे आयोजन केले आहे.

हा कथा सप्ताह शुक्रवार दिनांक 30 10 2026 रोजी सुरू झाला असून शुक्रवार दिनांक 6 11 2026 पर्यंत चालणार आहे या ठिकाणी काठापुर पोंदेवाडी जारकरवाडी पारगाव परिसरातील ग्रामस्थ कथा श्रवण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमत आहेत.

सायंकाळी सहा ते नऊ या वेळात कथा सोहळा संपन्न होत असून त्यानंतर अन्न प्रसादाचे आयोजन केले जाते या सोहळ्याला भर्तुहरी विधाटे,संतोष सुंबे, हनुमान मिटकर,गणेश विधाटे यांची संगीत साथ लाभली असून.पिरसाहेब ढोल लेझीम मंडळाच्या माध्यमातून या सप्ताहाचे नियोजन करण्यात येत आहे.


पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ७ ते १० पारायन,३ ते ४ नेमाचे भजन, सायंकाळी ४ ते ५ हरीपाठ, सायंकाळी ६ ते ९ संगीत कथा,९ ते १० महाप्रसाद या प्रकारे कार्यक्रम पार पडत आहेत.

Continue Reading

गावागावातुन

खेड्यापाड्यातही आता मोठ्या गणेश मूर्तींची धूम, आंबेगाव तालुक्यात पीओपीसह शाडूच्या मूर्तीना मागणी; तयारी अंतिम टप्प्यात

Published

on


मंचर-
येत्या काही दिवसानी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी ओबेगाव तालुक्यात शहर व ग्रामीण भागातील कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती साकारण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. कारागीर दिवस-रात्र मेहनत घेऊन मूर्तीना आकर्षक रूप देत असून, यंदा पीओपीसह पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी असल्याचे जिल्ह्याला घाऊक मूर्ती पुरवणारे गावडेवाडी ता आंबेगाव येथील श्रीधर आप्पा राजगुरू व प्रथमेश श्रीधर राजगुरू यांनी सांगितले आहे.

आंबेगाव तालुक्यातील कारखान्यांमध्ये रंगकाम, सजावट आणि वस्त्रांच्या नक्षीकामाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नैसर्गिक रंगांचा वापर आणि पारंपरिक स्वरूपाच्या मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक मंडळांसह नागरिकांनी आगाऊ नोंदणी (बुकिंग) सुरू केली असून, कारागीर ग्राहकांच्या पसंतीनुसार विशेष मूर्ती साकारत आहेत.कारखान्यात गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला असून, सध्या मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

आमच्या कारखान्यात सध्या सुमारे तीन हजार मूर्ती तयार असून, त्या सर्व ग्राहकांच्या पसंतीनुसार बनविल्या आहेत. १० ते २५ हजार रुपये किमतीच्या मोठ्या मूर्तीना मंडळांकडून विशेष मागणी आहे. शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी आहे.घरगुती गणेश मूर्तीनाही मोठी मागणी आहे – प्रथमेश श्रीधर राजगुरू
मूर्ति कारागीरगीरआदर्शगाव गावडेवाडी (ता .आंबेगाव )

पीओपी मूर्तीना पसंतीआकर्षक रंगसंगती
कमीवजन आणि परवडणाऱ्या किमतीमुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीना बाजारात मोठी मागणी आहे. प्रशासनाने पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन केले असले तरी, पीओपीच्या मूर्तीची विक्री वाढणार असल्याचा दावा श्रीधर राजगुरू यांनी केला आहे.मात्र कच्च्या मालाचे वाढलेले दर वाढलेली मजुरी यामुळे यावर्षी मूर्ती विक्रीत १५ ते २० टक्यांनी वाढ होणार असल्याचेही श्रीधर राजगुरू सांगतात दुसरीकडे, पर्यावरणप्रेमींकडूनजलप्रदूषणाबाबत चिंताव्यक्त करत शाडूच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन केले जात आहे


आदर्श गाव गावडेवाडी ता आंबेगाव येथील गणेश मूर्ती कारागीर कारखान्यात अखेरचा हात फिरवण्याच्या लगबगीत गुंतले आहेत

Continue Reading

गावागावातुन

पोंदेवाडीत कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी, 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान शेतकरी चिंतेत.

Published

on

मंचर-

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांच्या कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे झाली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून.सदर घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.या चोरीच्या घटनेमुळे कांदा साठवणूक केलेले शेतकरी चिंतेत आहेत.

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांची कांद्याची बराकी ही काठापूर पोंदेवाडी गावांच्या शिवेला डिंभा उजवा कालव्याच्या बाजूला आहे.या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही त्यामुळे या ठिकाणी रात्री काही घटना घडली तर कुणाला कळत नाही.

याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे केली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने.एक पिशवी कांद्याला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे सध्या घरापासून दूर अंतरावर असणाऱ्या कांदा बराकींमधून कांद्याची चोरी होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

त्यामुळे एकांटी असणाऱ्या कांदा वखारीतील कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पोंदेवाडी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.

सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरीच्या भितीने शेतकरी धास्तावला असुन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले.

Continue Reading
Advertisement

Trending