Connect with us

गावागावातुन

भीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.

Published

on

मंचर-

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामामध्ये गाळप केलेल्या ११,३८,४९६ मे.टन ऊसास रु.१७५/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. १९ कोटी ९२ लाख ३६ हजार सोमवार (२९ सप्टेंबर) रोजी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन श्री. बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


कारखान्याचे संस्थापक-संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या एकूण ११,३८,४९६ मे. टन ऊसासाठी रु. ३,२९०/- प्रती मे.टन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे. यापूर्वी एफ.आर.पी.प्रमाणे अदा केलेला रु. ३,०८०/- प्रती मे. टन वजा जाता रु. २१०/- प्रती मे.टन शिल्लक राहत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनुसार शिक्षण संस्था निधी रु.१०/- प्रती मे. टन व भाग विकास निधी रु.२५/- प्रती मे. टन वजा जाता उर्वरित रक्कम रु. १७५/- प्रती मे. टनाप्रमाणे होणारी रक्कम रु. १९ कोटी ९२ लाख ३६ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. दिपावलीपूर्वी शेतक-यांच्या बँक खात्यावर अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून जाहीर केल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केला असून रब्बी हंगामाची सोसायटी रक्कम भरणा करण्यास मदत होणार आहे.


कारखान्याने एफ.आर.पी.ची रक्कम नेहमीच वेळेत दिलेली आहे. याशिवाय वाढीव रक्कम कपाती वजा जाता रु. १७५/- प्रती मे. टन अंतिम हप्त्याचे स्वरुपात ऊस उत्पादक शेतक-यांना दिलेली आहे. लवकरच साखर वाटप देखील केले जाणार आहे. गाळप हंगाम २०२५-२६ करीता ऊस गाळपाची तयारी झालेली असून त्यामध्ये मशिनरीचे संपूर्ण ओव्हरऑयलिंग पूर्ण झालेले असून ऊस तोडणी व वाहतुकीसाठी आवश्यक यंत्रणेचे करार करून अॅडव्हान्स अदा केलेला आहे. संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप करण्याचे पूर्ण नियोजन केले आहे. कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू होणार.माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती.

Published

on

मंचर-

  • आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकरच शेतकरी अपघात विमा योजना सुरू होणार आहे. या योजनेस महाराष्ट्र शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली असून, याबाबतचे पत्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केले आहे. अशी माहिती राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. बाजार समितीमध्ये नियमित शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ च्या तरतुदीनुसार पूर्वमान्यता देण्यात आली आहे.

सर्व अटी व शर्तींची पूर्तता झाल्यानंतर योजनेला अंतिम मान्यता देण्याबाबतचे सविस्तर आदेश स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असल्याचे शासनाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अपघात विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.

Continue Reading

गावागावातुन

पोंदेवाडी येथे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 135 शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप.

Published

on

मंचर-

पोंदेवाडी ता आंबेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंदेवाडी येथील 135 मुला मुलींना शालेय साहित्याचे वाटप मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात व पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले.

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंदेवाडी येथील 135 मुला मुलींना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले, यावेळी दप्तर तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

‌यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात, पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर,अमोल वाळुंज,आनंदा पोंदे,निलेश मांजरे,अशोक दुगड,शिवराम पोखरकर,शिक्षक अनिल गावडे,आप्पासाहेब इखे,अर्जुन महाराज वाळुंज यांसह ग्रामस्थ तसेच दोन्हीही शाळेचे शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Continue Reading

गावागावातुन

देवगाव पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहतूक धोकादायक.कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी.

Published

on

‌‌मंचर-

      देवगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून त्या ठिकाणाहून नेहमी लोकांची वर्दळ असते.त्याचबरोबर देवगाव या ठिकाणाहून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळेचे विद्यार्थी जात आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घोड नदीला पुर आला या पुराच्या पाण्यामुळे 2 वर्षा पूर्वी बसविण्यात आलेले संरक्षण कठडे तुटून गेल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
    गावातील तरुण सहकाऱ्यांनी तात्पुरते स्वरूपात पुलावरील कचरा व लोखंडी जाळी बाजूला करून रस्ता सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर साईट गार्ड बसवावे अशी माघणी माजी सरपंच दिपाली खांडगे, दिलीप दाभाडे, माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, जयेश पोखरकर, निलेश खांडगे,अशोक खांडगे,विशाल खांडगे आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62