सामाजिक
भीमाशंकर कारखान्यास “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार प्रदान
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/07/IMG-20250703-WA0019-1000x600.jpg&description=भीमाशंकर कारखान्यास “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार प्रदान', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/07/IMG-20250703-WA0019-1000x600.jpg&description=भीमाशंकर कारखान्यास “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार प्रदान', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर-दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२३-२४ करीता देशातील “वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला असून कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी स्विकारला.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांनी गुरुवार (दि. ३ जुलै) रोजी सन २०२३-२४ राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार” सोहळा आयोजित करून देशातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार राज्य मंत्री श्रीमती निमुबेन बांभनिया, हरियाणातील ॠषीहूड विद्यापीठाचे कुलपती व माजी केंदीय मंत्री सुरेश प्रभू, हरियाणाचे सहकार मंत्री डॉ. अरविंद कुमार शर्मा, उत्तर प्रदेश राज्याचे ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि.,चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच देशातील साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पुरस्काराबाबत माहिती देताना म्हणाले, कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. आजपर्यंत कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १६ असे एकूण २९ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” ७ वेळा मिळविणारा देशातील एकमेव साखर कारखाना आहे. अशी माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
गावागावातुन
देवगाव पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहतूक धोकादायक.कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी.
मंचर-
देवगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून त्या ठिकाणाहून नेहमी लोकांची वर्दळ असते.त्याचबरोबर देवगाव या ठिकाणाहून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळेचे विद्यार्थी जात आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घोड नदीला पुर आला या पुराच्या पाण्यामुळे 2 वर्षा पूर्वी बसविण्यात आलेले संरक्षण कठडे तुटून गेल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गावातील तरुण सहकाऱ्यांनी तात्पुरते स्वरूपात पुलावरील कचरा व लोखंडी जाळी बाजूला करून रस्ता सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर साईट गार्ड बसवावे अशी माघणी माजी सरपंच दिपाली खांडगे, दिलीप दाभाडे, माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, जयेश पोखरकर, निलेश खांडगे,अशोक खांडगे,विशाल खांडगे आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

सामाजिक
अजामेळा दिंडीचे गावडेवाडी येथून प्रस्थान
मंचर-
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अजामेळा दिंडी कृ २६ चे .आदर्श गाव गावडेवाडी (ता आंबेगाव ) येथून पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवण्यात आले अशी माहीही दिंडी क २६ चे प्रमुख ह .भ .प. मधुकर महाराज गायकवाड व दिंडीचे चोपदार मधुकर महाराज साळवे यांनी दिली.
आळंदी प्रशासनाने दिंड्यांनी आळंदीत येऊ नये अशी आवाहन केल्याने अजामेळा दिंडीने या सूचनेला प्रतिसाद देऊन गावडेवाडी येथून गुरुवारी (ता .९ ) वारकऱ्यांच्या उपस्थितीत गावडेवाडी येथे छत्रपती शिवाजी चौकात पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले .यावेळी दिंडीचे संस्थापक वैकुंठवासी निवृत्ती महाराज गायकवाड व सुभद्राबाई निवृत्ती महाराज गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ . पांडुरंग निवृत्ती महाराज गायकवाड, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र रामदास गावडे,कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी गावडेवाडीचे ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते पुंडलिक वर देव हरी विठ्ठल च्या गजरात दिंडीने प्रस्थान ठेवले यावेळी मच्छिंद्र शेठ गावडे, ऋषिकेश गावडे, संतोष गावडे, ह भ प सुरेश महाराज गावडे, ह भ प बाळू बुवा शेळके ,ह भ प ज्ञानेश्वर गावडे, ह भ प लहू महाराज गावडे ,मंदाताई गावडे ,सविता मधुकर गायकवाड ,त्याचप्रमाणे कमलादेवी मळ्यातील बहुसंख्य तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉ प्रतिक गायकवाड प्रा.शीलाताई पांडुरंग गायकवाड तसेच महिला चांगुणाबाई शेळके, कौसाबाई टाव्हरे, हरणाबाई टाव्हरे, सुनील महाराज राजगुरू, बाळू महादू राजगुरू ,वाहन चालक कैलास पडवळ,चालक बाबाजी गव्हाणे आदींनी दिंडीला सहाय्य केले.
यावेळी गावडेवाडी ग्रामस्थांनी सर्वांना दिंडी ला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यामध्ये भिवाजी उमाजी गावडे ,अनाजी मारुती गावडे ,नरेंद्र गावडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रवींद्र गावडे ,माजी सरपंच देवराम गावडे, संतोष गावडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या वतीने दिंडीला शुभेच्छा दिल्या
आदर्श गाव गावडेवाडी (ता . आंबेगाव ) येथून माऊलींच्या पायी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अजमेळा दिंडी क्रमांक २६ ने प्रस्थान ठेवले
सामाजिक
काठापुर बुद्रुक व पोंदेवाडी येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने मोठे नुकस घरे,गोठे,यांचे पत्रे उडाले.नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.

मंचर –
काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव या ठिकाणी साडे चार ते पाच वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरे,गोठे, यांचे पत्रे उडाले आहेत.अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने नुकसान झाले आहे. अनेक झाडेझुडपे ही रस्त्यावर पडल्याने रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे एकंदरीतच आलेल्या वादळाने काठापुर बुद्रुक मधे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे शासनाने करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर बुद्रुक व पोंदेवाडी येथे आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर वादळ आल्याने मोठे नुकसान झाले आहे. गावातील अनेक घरांची कौले पत्रे उडून गेली आहेत कांदा चाळीचे ही पत्रे कवले उडून गेले आहेत. काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याने घरे व गोठे यांचे नुकसान झाले आहे. कांदा चाळींवर विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.झाडे झुडपे मोठ्या प्रमाणावर पडली असून त्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे एकंदरीतच काठापुर बुद्रुक या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आलेल्या वादळाने झालेल्या नुकसानीची शासनाने या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच अशोक करंडे यांनी केली आहे.

ओढ्यांनाही मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. एकंदरीतच परिस्थिती पाहता काठापुर बुद्रुक या ठिकाणी झालेला पाऊस व वादळ याचा मोठ्या प्रमाणावर फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
