Connect with us

महाराष्ट्र

मैत्रीपेक्षा या जगात सर्वश्रेष्ठ असे काहीच नाही. माणसाला आयुष्यात एक तरी चांगला मित्र असावा.कवी अनंत राऊत

Published

on

मंचर प्रतिनिधी-

मैत्रीपेक्षा या जगात सर्वश्रेष्ठ असे काहीच नाही. माणसाला आयुष्यात एक तरी चांगला मित्र असावा .कोरोनाच्या काळात सर्व लोक दुर जात होते.अशावेळी मित्रच मदतीला धावून येत होते. इतर नाती ही तुमच्या जन्माने तुम्हाला मिळतात.परंतु मित्र हे नातं मात्र तुम्हाला तुमच्या संगतीने सोबतीने मिळतं आणि ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहतं. चांगला मित्र असेल तर माणूस कधीच आत्महत्या करणार नाही.असे प्रसिद्ध कवी अनंत राऊत म्हणाले.


मंचर( ता. आंबेगाव) येथे आंबेगाव विचार मंच,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका,संतोषभाऊ भोर युवा मंच यांच्या वतीने शरदचंद्र पवार सभागृह याठिकाणी आयोजित कवी संमेलना प्रसंगी अनंत राऊत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष अंकित जाधव,मंचर शहर अध्यक्ष सुहास बाणखेले, आंबेगाव विचार मंचाचे अध्यक्ष ओंकार कराळे, कवी दत्ता पायमोडे, विशाल करंडे ,संतोष गाढवे, स्वराज्य कलाकार महासंघाचे अध्यक्ष रामदास करंडे,मनोज शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना कवी अनंत राऊत यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपल्या कवितेतून भाष्य केले.मित्र वनव्यामध्ये गाराव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, त्याचप्रमाणे भोंगा या कवितांनी रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे प्रस्तावित अध्यक्ष अंकित जाधव,सूत्रसंचालन संतोष गाढवे ,स्वागत ओंकार कराळे, तर आभार सुहास बाणखेले यांनी मानले. यावेळी 35 कवींनी वेगवेगळ्या विषयावर आपल्या रचना सादर केल्या.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभ, पहिल्या दिवशी एक लाख भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन.

Published

on

पारगाव:

नागापूर (ता. आंबेगाव) येथील प्रसिद्ध श्री थापलिंग यात्रेला आज शनिवारी (दि. ३)भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. “सदानंदाचा येळकोट” असा जयघोष करून पारंपरिक तळीभंडार केला.
पौष पौर्णिमेला थापलिंग गडावर दोन दिवस मोठी यात्रा भरते. यंदा यात्रा शनिवारी रविवारी सुट्ट्यांच्या दिवशी आल्याने पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळपासूनच गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. राज्याच्या विविध भागांतून तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यात्रेसाठी दाखल झाले होते. अनेक भाविकांनी आपल्या नवसपूर्तीसाठी बैलगाडे घाटात पळवले. तर काही भाविकांनी जागरण करून कुलाचार पूर्ण करून श्री खंडोबा देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दुपारी गडावर रांजणी वळती येथील खुडे बंधूंच्या काठीपालख्या वाजत गाजत आल्या.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांग, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त गडावर ठेवण्यात आला आहे.
थापलिंग गडावर जिलेबी भजी हॉटेल, रसवंतीगृहे, गरम कपड्यांची दुकाने, खेळण्याची दुकाने , आकाशी पाळणे, लहान मुलांसाठी पाळणे मोठ्या प्रमाणावर व्यवसायिकांनी लावले आहेत.
रविवारी भरयात्रेचा दिवस असल्याने अजून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असून संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व स्वयंसेवकांच्या सहकार्याने शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा पार पडावी. यासाठी थापलींग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नागापूर ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहेत.

नागापूर (ता.आंबेगाव)येथील थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.

Continue Reading

गावागावातुन

थापलिंग खंडोबा मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर लोकवर्गणीतून तीन कोटी रुपये खर्चून होणार मंदिर.

Published

on

मंचर :

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर (ता. आंबेगाव )येथील थापलिंग खंडोबा देवाच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. लोकवर्गणी, देणगीतून सुमारे तीन कोटी रुपये खर्चून खंडोबा देवाचे मंदिर उभे राहणार आहे.अशी माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टने दिली.
थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी अनेक भाविकभक्तांची मागणी होती. देवस्थान ट्रस्टने गतवर्षापासून मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम सुरू केले. मंदिरासाठी तीन कोटी रुपये खर्च होणार आहे. मंदिराचे संपूर्ण काम हे देगलूर काळा पाषाण या दगडामध्ये होणार आहे. हा दगड नांदेड येथून उपलब्ध केला आहे. जमिनीपासून सुमारे ६५ फूट उंचीचे हे मंदिर होणार आहे. थापलिंग गड हा उंचीवर आहे. त्यामुळे हे मंदिर गडाच्या चोहोबाजूंनी सहज दिसणार आहे. मंदिरासाठी नागापूर ग्रामस्थांनी मानसी दोन हजार रुपये वर्गणी गोळा केली आहे. येत्या वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण होईल. मंदिरासाठी मोठा निधी आवश्यक आहे यासाठी भाविक भक्तांनी मंदिराच्या कामासाठी सढळ हाताने मदत करावी. असे आवाहन थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून विवाहांचे बुकिंग सुरू-: श्री. क्षेत्र. थापलिंग गडावर लग्न समारंभासाठी १५० बाय ८० फूट आकाराचा सभामंडप उभारण्यात आला आहे. सुमारे १२ हजार स्क्वेअर फुट आकाराच्या सभामंडपात गोरगरिबांची लग्न होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून विवाहाच्या तारखांचे बुकिंग सुरू होणार आहे. गोरगरिब कुटुंबांना चांगला फायदा होणार आहे.

 नागापूर (ता.आंबेगाव) येथील थापलिंग गडावर सुरू असलेले खंडोबा देवाचे मंदिर.
Continue Reading

गावागावातुन

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सोमवारी रास्ता रोको व गावबंद आंदोलन.

Published

on

मंचर-

पिंपरखेड ता शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु.रोहन विलास बोंबे वय वर्ष-१३ या बालकाचा मृत्यू झाल्याने.व मागील एक महिन्यात तीन व्यक्तींचे मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याने मंचर अवसरी फाटा येथील नंदि चौकात पुणे नाशिक महामार्ग सोमवार दिनांक ०३/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता रोखण्यात येणार आहे.
यावेळी जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेड तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहनार आहेत.
त्याचप्रमाणे सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थ गाव बंद आंदोलन करणार आहेत.

Continue Reading
Advertisement

Trending