गावागावातुन
विठ्ठलवाडी ता.आंबेगाव येथे अवतरला वैष्णवांचा मेळा.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परीषद प्राथ.शाळा विठ्ठलवाडी (ता . आंबेगाव ) येथेे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीसह अनेक साधुसंतांच्या वेशभूषा साकारत दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘सौर ऊर्जेचा वापर करा’, ‘पर्यावरण वाचवा देश वाचवा’, ‘स्वच्छता तेथे देवता’ असे अनेक सामाजिक संदेश देत विठू माऊलींचा नामघोष केला.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे विठू माऊली.आणि आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या वैष्णवांचा मेळाच.आणि हा मेळा आज विठ्ठलवाडीत साकार झाला होता.या दिंडी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापिका मधुरा वैष्णव व सहशिक्षिका श्रीमती मृणाली झुंजार यांनी केले होते.या बालचमुंच्या दिंडीचे सर्व ग्रामस्थ, महिला यांनी फुलांच्या व रांगोळ्यांच्या पायघड्या घालून औक्षण करून स्वागत केले. मुलांना यावेळी खाऊ वाटप केला. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत तसेच सर्व संस्था तसेच सर्व ग्रामस्थ या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.
गावागावातुन
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान,अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.
निरगुडसर-
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गारा पडल्या आहेत त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल झाला असून अवकाळी पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे.गेल्या दोन-तीन दिवसापासुन आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातही पाऊस हुलकावणी देत होता.परंतु आज सायंकाळी पाच वाजता वादळ वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी लाखनगाव देवगाव,पोंदेवाडी, काठापुर जारकरवाडी या गावांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारा पडल्या त्यामुळे ठिकाणी नुकसान झाली आहे. लाखणगाव या ठिकाणी पोल्ट्रीची भिंत पडल्याने शेतकरी विक्रम राजाराम धरम यांचे नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उस पडला आहे. तसेच काढणी सुरू असलेला कांदा व काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गहू जनावरांचे चारा पिके इतर तरकारी पिके यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर ठिकाणी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई यावी अशी मागणी माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.

गावागावातुन
पोंदेवाडी येथे दिवसा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण.वनविभागाने पिंजराला लावावा,पंचायत समितीच्या सदस्या अंकिता वाळुंज यांची मागणी.
मंचर-
पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील रोडेवस्ती डिंभा उजव्या काल्याव्यालगद दिवसा बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असुन सध्या कांदे काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भिती पसरली असुन या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी पंचायत समितीच्या सदस्य अंकिता वाळुंज यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बारमाही पाण्याची उपलब्धता आहे. येथे उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.सध्या उसाची तोडणी झाली आहे. त्यामुळे मोठ्या उसाचे क्षेत्र कमी झाल्याने तसेच पाण्याचा व अन्नाचा तुटवला जाणवु लागल्याने बिबटे दिवसाढवळ्या मनुष्यवस्थित फिरू लागले आहेत.पोंदेवाडी गावातून डिंभे धरणाचा उजवा कालवा जातो.या कालव्याच्या लगत रोडेवस्ती लगत दिवसा बिबट्या दिसून आला. या ठिकाणी सध्या कांद्याची काढणी सुरू असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शेतमजूर कांदे काढणी करत आहेत. अशा परिस्थितीत बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर बिबट्या लगेच असताना शेतकरी निलेश मांजरे यांनी या बिबट्याचे शूटिंग आपल्या मोबाईल मध्ये काढले. बिबट्या हा माणसांच्या समोरून जात असताना कुठेही तो न घाबरता निवांत निघुन गेला. त्यामुळे माणसांची भीती बिबट्याला राहिली नसून हा बिबट्या कधीही माणसांवर हल्ला करू शकतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्या फिरत असल्याची माहिती वनपाल नीलम चव्हाण यांना दिली असुन. वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, संदीप पोखरकर व ग्रामस्थांनी केली आहे.
गावागावातुन
पोंदेवाडी येथे ट्रांसफार्मर फोडल्याने पोखरकरवस्ती, वाळूंजवस्ती येथील 30 ते 35 घरे अंधारात, ट्रान्सफॉर्मर बसवावा पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज यांची मागणी.
मंचर-
पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील पोखरकर वस्ती शेजारील महावितरण कंपनीचा ट्रांसफार्मर काल रात्री अज्ञात चोरट्यांनी डीपी स्ट्रक्चर वरून खाली पाडुन तो फोडण्यात आला त्यामुळे पोखरकरवस्ती आणि वाळूंजवस्ती येथील 30 ते 35 घरे मध्यरात्रीपासून अंधारात असून या ट्रांसफार्मरवर असणाऱ्या विद्युत मोटारी बंद झाल्याने जनावरांचा व शेती पिकांचा पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. महावितरण कंपनीने येथे लवकरात लवकर दुसरा ट्रान्सफॉर्मर बसवावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज यांनी केली आहे.


पोंदेवाडी येथील पोखरकरवस्ती या ठिकाणी महावितरण कंपनीचे ट्रांसफार्मर असून या माध्यमातून पोखरकरवस्ती व वाळूज वस्ती परिसरातील घरांना व शेती पंपांना वीज पुरवठा केला जातो. परंतु रात्री अज्ञात चोरट्याने चोरीच्या उद्देशाने सदर ट्रान्सफॉर्मर डीपी स्ट्रक्चर वर खाली पाडून तो फोडला आहे. त्यामुळे येथील वीजपुरवठा खंडित झाला असून शेतकऱ्यांना जनावरांच्या पिण्यासाठी व शेती पिकांसाठी पाणी देणे अवघड बनले आहे. त्याचप्रमाणे घरांनाही विज पुरवठा होत नसल्याने सर्वच कामे ठप्प झाली आहेत.सदर घटनेची माहिती पारगाव कारखाना पोलीस स्टेशनला देण्यात आली असून पोलिसांनी या घटनेचा तपास करून चोरट्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन6 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
