सामाजिक
डिंभे धरणातून घोड नदीपात्रात ३२००० क्युसेसने पाणी. मीना नदीच्या पात्रातही पाणी सोडल्याने पारगाव,देवगाव,लाखनगाव परिसरात नदीपात्र दुथडी भरून वाहत असून.काठापुर येथील स्मशानभूमी पाण्याखाली.तर शिव मंदिराला पाण्याचा वेढा.
निरगुडसर-
हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणातून घोड नदीपात्रात ३२००० क्युसेसने पाणी सोडले जात असल्याने घोडनदी दुथडी भरून वाहत आहे.त्याचप्रमाणे मीना नदीच्या पात्रातही पाणी सोडल्याने पारगाव शिंगवे ता.आंबेगाव या ठिकाणी होणाऱ्या संगमाच्या पुढे काठापुर,देवगाव,लाखनगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर नदीपात्र दुथडी भरून वाहत असून.काठापुर येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.तर नदीतील शिव मंदिराला पाण्याने वेडले आहे.
आंबेगाव तालुक्यात असणारे हुतात्मा बाबू गेनु सागर डिंभे धरण शंभर टक्के भरले आहे. त्याचप्रमाणे या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसत असल्याने धरणातून घोठनदीपात्रात पाण्याचा विसर्ग २५७०० क्युसेसने सोडण्यात येत आहे. त्यामुळे घोड नदीवरून दुथडी भरून वाहत आहे.त्यातच मीना नदीलाही वडज ता.जुन्नर धरणातून पाणी सोडल्याने मीना नदीची दुथडी भरून वाहत आहे.
पारगाव ता. आंबेगाव या ठिकाणी घोड व मीना या दोन नद्यांचा संगम होऊन त्या पुढील गावांमध्ये या दोन्ही नद्यांचे पाणी एकत्र येते.पारगाव या ठिकाणी संगम झाल्याच्या नंतर काठापुर,देवगाव, लाखनगाव या आंबेगाव तालुक्यातील गावांमध्ये पाण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.नदीपात्रातील पाणी वाढल्याने काठापुर बुद्रुक येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. नदीतील शिवमंदिरालाही या पाण्याने वेडा घातला आहे.त्याचप्रमाणे लाखनगाव या ठिकाणचा जुनापुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.एकंदरीतच घोड आणि मीना नद्यांचे पाणी एकत्र झाल्यानंतर तेथून पुढील गावांमध्ये मात्र या पाण्याचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात सध्या जलसंकट आले असून याचा फटका संपूर्ण महाराष्ट्रातील शेतीला बसला आहे.एकंदरीत आंबेगाव तालुक्यातही या पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून शेतातील पिके खराब झाली आहेत.त्यामुळे शासनाने या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.