महाराष्ट्र
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांचा सन्मान
निरगुडसर –
मूळच्या आंबेगाव तालुक्यातील वळती गावच्या पोलीस उपनिरीक्षक प्रणाली बारकू बेनके यांचा पोलीस सेवेतील उत्कृष्ट काम केले केल्याबद्दल नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
रविवार (दि.१७) ऑगस्ट रोजी नागपूर येथे हॉटेल सेंटर पॉईंट मध्ये जाहीर कार्यक्रमात बेनके यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे, तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा कलाकार समीर चौघुले,चेतना भट ,प्रियदर्शनी इंदुलकर तसेच नागपूर शहरचे पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांचा सन्मान करण्यात आला.
प्रणाली बेनके यांनी तपासी अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
प्रणाली बेनके यांचे वळती ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले आहे.