गावागावातुन

जल जीवन मिशन योजने अंतर्गत टप्पा क्रमांक तिनचे प्रशिक्षण पारगाव येथे संपन्न.

Published

on

निरगुडसर :- जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस 55 लिटर याप्रमाणे शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हे मुख्य उद्दिष्ट असून योजना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे मत यशदाचे प्रशिक्षक कुंडलिक कोहीनकर यांनी व्यक्त केले.

पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव)या ठिकाणी जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती आंबेगाव,साईप्रेम ग्रामीण विकास संस्था यांच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक तिनचे प्रशिक्षण नुकतेच पार पडलेले यावेळी ते बोलत होते.


यावेळी प्रशिक्षक माधवी देशपांडे,कुंडलीक कोहीनकर पारगाव च्या सरपंच श्वेता ढोबळे,मेंगडेवाडीचे सरपंच बाळासाहेब मेंगडे,काठापुर चे सरपंचअशोक करंडे,वाळुंज नगरच्या सरपंच त्रुप्ती वाळुंज भागडीच्या उपसरपंच लता उंडे पारगावचे उपसरपंच नितीन ढोबळे,विरेंद्र ढोबळे विशाल करंडे उपस्थित होते माधवी देशपांडे व कुंडलिक कोहीनकर यांनी मार्गदर्शक व माहिती दिली.जल जिवन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण यावेळी पार पडले.या योजने अंतर्गत जल जीवन मिशन योजना अंतर्गत उभ्या राहिलेल्या योजनेचे हस्तांतरण,देखभाल, दुरुस्ती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
संपूर्ण भारतभर जल जिवन योजने अंतर्गत हर घर नल से जल ही योजना राबवली जात असून यावर मोठ प्रमाणावर खर्च केला जात आहे.ही योजना सुरू असताना स्थानिक ग्रामपंचायतीची महत्त्वाची भुमिका असली पाहिजे. या योजनेचे पाणी नियोजन कसे केले पाहिजे योजना चालवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात,पाणी पट्टी वसली कशी करावी,गावातील शाश्वत विकास याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पारगाव परिसरातील 20 ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version