गावागावातुन
भीमाशंकरचा बॉयलर व गव्हाण पूजन समारंभ २ ऑक्टोबरला.
मंचर-
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ च्या २६ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व गव्हाण पूजन समारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता कारखान्याचे संस्थापक-संचालक व माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे.
वरील कार्यक्रम वारकरी सांप्रदायातील संत, महंत, ह.भ.प. किर्तनकार महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला आहे. तरी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले.