गावागावातुन

बेल्हा जेजुरी महामार्गावर घोड नदीवर लाखनगाव (तालुका आंबेगाव ) येथे असणाऱ्या पुलाचे काम पुन्हा सुरू.

Published

on

निरगुडसर-बेल्हा जेजुरी महामार्गावर घोड नदीवर लाखनगाव (तालुका आंबेगाव ) येथे असणाऱ्या पुलाचे काम अनेक दिवसापासून बंद होते हे रखडलेले काम पुन्हा एकदा सुरू झाल्याने प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून. हा पुल लवकरात लवकर पूर्ण होऊन वाहतुकीस खुला व्हावा अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ व वाहनचालकांची आहे.

बेल्हे तालुका जुन्नर ते जेजुरी तालुका पुरंदर या दोन महत्त्वाच्या गावांना जोडणारा बेल्हा जेजुरी हा महामार्ग मागील अनेक वर्षापासून बनवण्यात आला आहे. या महामार्गावर वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे परंतु या महामार्गावर लाखनगाव तालुका आंबेगाव या ठिकाणी घोडनदीवर मोठा पूल नसल्याने जुन्या पुलाचा वापर करण्यात येत होता. जुना पूल हा लहान कमी उंचीचा व कमी रुंदीचा असल्याने या पुलावरून एका वेळी एकच वाहन जात होते. त्याचप्रमाणे या पुलाची उंची कमी असल्याने नदिचे पाणी पलावरून जाते त्यामुळे पावसाळ्यात अनेकवेळा हा पुल बंद असतो. त्याचप्रमाणे एखादा अपघात पुलावर झाला तर दोन्ही बाजूंची वाहतूक बंद होते.त्यामुळे हा पुल वाहतुकीला कायमच अडथळा ठरत होता. याला पर्याय म्हणून मागील काही वर्षांपूर्वी नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. परंतु मागील अनेक महिन्यांपासून हे बांधकाम बंद होते. त्यामुळे हा नवीन पूल कधी तयार होणार हा प्रश्न येथील स्थानिक ग्रामस्थ त्याचप्रमाणे वाहन चालकांना पडला होता.

परंतु सध्या या पुलाचे काम सुरू झाले असून येथील नागरिकांनी त्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.हा पूल जर पूर्ण झाला तर बेल्हा ते जेजुरी या महामार्गाला येणारा नदीवरील अडथळा कायमचा दूर होईल आणि या महामार्गाने होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढवण्यास फायदा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होईल.तसेच स्थानिक गावातील नागरिकांनाही व्यवसाय वाढीसाठी होईल.त्यामुळे एकंदरीत या पुलाचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version