सामाजिक

पोंदेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 30 विद्यार्थीना मोफत क्रीडा गणवेशाचे वाटप.

Published

on

निरगुडसर –

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या वतीने शाळा सुधार फंडाच्या माध्यमातून 30 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोफत क्रीडा गणवेशाचे वाटप करण्यात आले.

पोंदेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रामस्थांच्या वतीने १९५० साली शालेय मुलांच्या खाऊसाठी हा फंड सुरू केला होता. तेंव्हापासून या फंडाच्या माध्यमातून अनेक सामाजीक उपक्रम राबवले गेले.शाळेच्या बांधकाम व सुधारणेसाठी या फंडातुन सहाय्य केले जाते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा गणेशाचे वाटप करण्यात आले.


यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर, वसंत पोंदे ,चंद्रकांत विरकर,अनिल गावडे सर,स्वाती डोंगरे मॅडम ,राहुल पोखरकर, संदीप घोलप गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version