गावागावातुन

ज्येष्ठ लोकनाट्य तमाशा कलावंत आजही उपेक्षितच.अनिल वाळुंज यांची खंत.

Published

on

निरगुडसर: ग्रामीण भागात करमणुकीचे साधन म्हणून तमाशाकडे पाहिले जाते. तमाशा कलावंतांचे मानधन हे तुटपुंजे असते. त्यातून तो निवृत्तीनंतर घर चालवू शकत नाही. त्यामुळे तो उपेक्षितच राहतो, अशी खंत आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी व्यक्त केली. अशा ज्येष्ठ कलाकारांची शासनाने दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

तमाशा क्षेत्रातील जेष्ठ कलाकार निवृत्तीबुवा जाधव पोंदेवाडीकर (वय ९०) यांनी नुकतीच तमाशा क्षेत्रातून निवृत्ती घेतली. त्यानिमित्ताने त्यांचा सन्मान पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज बोलत होते. यावेळी जयसिंग पोंदे, महेंद्र पोखरकर, संदीप पोखरकर, नारायण हारके,नानाभाऊ पोखरकर, नामदेव पोखरकर, अमोल वाळुंज, पोपट रोडे, झुंबर वाळुंज यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, पांडुरंग मुळे, भिका भीमा सांगवीकर इत्यादी तमाशामध्ये पोंदेवाडी गावचे जेष्ठ कलाकार निवृत्ती भाऊ जाधव यांनी मावशी हे श्री पात्र करून प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यांनी पोंदेवाडी गावचे नाव राज्यभर आपल्या कलाक्षेत्रातून पोहोचवले. जुन्या काळी चित्रपट किंवा डिजिटल युग नव्हते. त्यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांना करमणुकीसाठी तमाशा, भारुडे,नाटक किंवा कलगीतुरे इत्यादी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम व्हायचे. त्या माध्यमातून नागरिकांची करमणूक व्हायची, परंतु अशा दुर्मिळ कलाकारांना पाठबळ देण्यासाठी सरकारने त्यांना देत असलेले मानधन हे तुटपूंजे आहे. त्यामध्ये भरीव वाढ करावी तसेच त्यांचा शासन दरबारी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version