गावागावातुन

काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्सव साजरा.

Published

on

निरगुडसर -शिवजयंती उत्सवा निमित्त काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची वाजत गाजत पालखीतून मिरवणूक काढून विविध कार्यक्रमांनी शिवजयंती उत्सव शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात आला.

शिवजयंती उत्सव महाराष्ट्रात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असताना काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी किल्ले शिवनेरी ते काठापूर बुद्रुक शिवज्वोत यात्रा काढण्यात आली यामध्ये मयुर जाधव,समिर करंडे,रुषी शेटे,संदिप जाधव,ओंकार वायाळ,सागर करंजखेले,निशांत करंडे,आकाश थोरात, ओंकार करंडे,अमोल करंडे यांसह तरुण सहभागी झाले होते.


काठापूर बुद्रुक येथे शिवज्वोतीचे आगमन झाल्यावर गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा परिषद शाळा काठापूर बुद्रुक चे विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच अशोक करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे,सोसायटीचे चेअरमन कुंडलिक जोरी,संतोष करंडे,राहुल भुरके, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत थोरात, उपाध्यक्ष योगेश करंडे, संपत करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, हेमंत करंडे,संजय करंडे,मंगेश करंडे,पुरुषोत्तम जोरी,रमेश खुडे, हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक दत्तात्रय वाव्हळ,सुरेश भागवत, दिनेश तुळे,निलीमा वळसे हे सहभागी झाले होते.


याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवणावर वेगवेगळ्या प्रसंगानुरूप भाषणे केली. गेली 11 वर्षे शिवसह्याद्री प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती उत्सव काठापूर बुद्रुक मध्ये उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version