सामाजिक
काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव येथील अष्टविनायक महामार्गावर पोंदेवाडी फाटा चौकात अपघाताचे प्रमाण वाढले.चौक विस्तारीकरणाची होतेय माघणी.
निरगुडसर-
काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव येथील अष्टविनायक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली असून.या महामार्गाला काठापुर पोंदेवाडी रस्ता छेदुन जातो त्या पोंदेवाडी फाटा चौकामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असुन.आजपर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे.त्यामुळे या चौकातील रस्ता रुंदीकरण करून चौकात विस्तारीकरण करावे अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व काठापूर चे सरपंच अशोक करंडे यांनी केली आहे.
काठापूर बुद्रुक गावातुन अष्टविनायक महामार्ग गैला आहे.हा महामार्ग गेल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक या रस्त्यावर वाढली आहे. काल या ठिकाणी या चौकात अपघात होऊन एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. या आधीही या ठिकाणी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अष्टविनायक महामार्गाला काठापूर बुद्रुक गावचे हद्दीत.काठापुर पोंदेवाडी रस्त्या छेदुन जातो त्या पोंदेवाडी फाटा हनुमान चौकाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे.शिरुर बाजू कडून येणाऱ्या गाड्या पोंदेवाडी मंचर च्या बाजूला वळत असताना अतिशय कमी जागा या ठिकाणी आहे.त्यामुळे अनेक वेळा वाहन चालकांना गाडी पाठीमागे घेऊन हे वळण घ्यावी लागते. त्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.आत्तापर्यंत तीन लोकांचे मृत्यू या चौकात झाले असून अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे या महामार्गावर असणाऱ्या चौकाचे विस्तारीकरण करून येथील 100 मीटर अंतराचे रस्त्याचे रुंदीकरण करून या ठिकाणी अपघात कमी होतील याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी अशी मागणी काठापुरचे माजी उपसरपंच विशाल करंडे व पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.