गावागावातुन

काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव येथील गाव नकाशात असलेले आठ व नकाशात नसलेले परंतु वहिवाटीचे शिव पानंद अशा २५ रस्त्यांचे सर्वेक्षण पुर्ण.

Published

on

निरगुडसर –

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथील गाव नकाशात असलेले आठ व नकाशात नसलेले परंतु वहिवाटीचे शिव पानंद अशा २५ रस्त्यांचे सर्वेक्षण पुर्ण झाले असुन.याचा फायदा शेतकऱ्यांना होनार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत गावोगावी असनारे शेतरस्ते, वहिवाटीचे रस्ते,शिवरस्ते,पानंदरस्ते या सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करुन,अडचणी सोडवुन,या रस्त्यांना क्रमांक देऊन त्याची नोंद करणे, याबाबत मोहिम राबवली जात आहे.ग्रामिण भागातील शेतात जाण्यायेसाठी मोठ्या प्रमाणात त्रास होतो.यावर कायमचा मार्ग काढण्यासाठी ही मोहीम सुरू आहे.


आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हि मोहीम महसुल विभाग भुमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून सुरू आहे काठापूर बुद्रुक येथे या मोहिमे अंतर्गत गाव नकाशात असलेले आठ व गाव नकाशात नसलेले २५ अशा एकुण ३३सस्त्यांची मोजणी पुर्ण झाली आहे.याकामी ग्राममहसुल अधिकारी जितेंद्र शेजुळ,सर्व्हेअर उन्मेष ठोसरे, संतोष पवार,सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे, पोलीस पाटील अमोल करंडे, तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ ढमाले,सुदर्शन करंडे,संतोष करंडे, विकास दाभाडे,फकीर करंडे, बजरंग करंडे व स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version