शेतीशिवार
आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची सहकार मंत्र्यांकडे मागणी
मंचर प्रतिनिधी
आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ४५ गावातील शेती पिके उजव्या कालव्याला पाणी नसल्याने धोक्यात आली आहेत. उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ४५ गावातील ऊस, कांदा, चारा पिके तरकारी पिके, पालेभाज्या सध्या सुकू
लागले आहेत. शेततळी तसेच पाझर तलाव, तळी, ओढे, नाले कोरडे पडले आहेत. विहिरींचे पाणी पातळी खालवली आहे. त्यामुळे पिके जगवायला कालव्याला पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच ऊन्हाची
तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्याने सहा ते सात दिवसात शेती पिकांना पाणी द्यावे लागते.
अन्यथा पिके सुकून जातात. सध्या शेतात उभी असणारी पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे डिंभे उजव्या
कालव्याला पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. कारण यावर्षी धरणात असणारा पाणीसाठा व उन्हाची वाढणारी तीव्रता यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज निर्माण होणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केला नाही, तर मात्र एप्रिल, मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या संकटाला सामोरे जाऊ लागू शकते
गावागावातुन
आंबेगाव तालुक्यातील काठापुर बुद्रुक, लाखनगाव,धामणी, निरगुडसर,लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी,व परिसरातील रस्ते व इतर समस्या लवकर दुर होतील.विवेक पाटील यांची माहिती.
मंचर- आंबेगाव तालुक्यातील काठापुर बुद्रुक, लाखनगाव,धामणी, निरगुडसर,लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी,व परिसरातील रस्ते व इतर समस्यांबाबत जुन्नर (ता. जुन्नर) या ठिकाणी नुकतीच बैठक पार पडली यावेळी या बैठकीत सदर रस्त्यांच्या बाबतीत विषयांवर वनविभागचे पूर्ण सहकार्य करेल व या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला जाईल असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक पाटील यांनी सांगितले.

माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (अध्यक्ष, म्हाडा, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग हद्दीतील काही रहदारीच्या रस्त्यांबाबत आलेल्या अडी-अडचणीवर पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत खाडे (उपवनसंरक्षक, जुन्नर उपविभाग, जुन्नर) यांसमवेत विविध विषयांवर बैठक पार पडली.

यामध्ये काठापूर बु. येथील वैदवाडी-पोंडेवाडी रोड ते डिंभा उजवा कालवा कार रस्ता, लाखणगाव रोड ते काकडे-भुमकर वस्ती रस्ता वैदवाडी-पोंडेवाडी रोड ते डिंभा उजवा कालवा (पीरसाहेब मंदिर मार्गे) रस्ता करणे,लाखणगाव येथे कवठे रोड ते पाटील-तागडवस्ती रस्ता करणे, धामणी येथे मधलामळा ते स्मशानभूमी (बायपास मार्ग) रस्ता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या पाईप लाईन बाबत मार्ग काढणे,निरगुडसर, बेलसरवाडी येथे स्थानिक शेतकऱ्यांना वनविभाग हद्द निश्चित करणे. तसेच आदिवासी भागातील वनविभाग बाबत विविध अडचणी, लोणी येथून वडगावपीर, मांदळेवाडी गावासाठी वनविभाग परवानगीने विद्युत वाहक पोल उभे करणे, महाळुंगे पडवळ येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या पाईप लाईन ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करुन आवश्यक निधी देखील उपलब्ध करुन पुर्ण केले जाईल, असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी सभापती संजय गवारी, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष रविंद्र करंजखेले, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, मंचर वनपरीक्षेत्र अधिकारी विकास भोसले, सार्व. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.मोरे, मंचर महावितरण विभागाचे अधिकारी तसेच लाखणगाव येथील माऊली पाटील,धामणीचे सरपंच अक्षय विधाटे,काठापूर बु. गावचे मा.उपसरपंच विशाल करंडे, सुधीर भुमकर, बाळासाहेब करंडे, महीपत टाव्हरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
गावागावातुन
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सोमवारी रास्ता रोको व गावबंद आंदोलन.
मंचर-
पिंपरखेड ता शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु.रोहन विलास बोंबे वय वर्ष-१३ या बालकाचा मृत्यू झाल्याने.व मागील एक महिन्यात तीन व्यक्तींचे मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याने मंचर अवसरी फाटा येथील नंदि चौकात पुणे नाशिक महामार्ग सोमवार दिनांक ०३/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता रोखण्यात येणार आहे.
यावेळी जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेड तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहनार आहेत.
त्याचप्रमाणे सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थ गाव बंद आंदोलन करणार आहेत.
गावागावातुन
पिंपरखेड ता. शिरूर येथे बिबट्याच्या हल्यात रोहन विलास बोंबे या १३ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी केला रोडेवाडी फाटा येथे बेल्हा जेजुरी व अष्टविनायक महामार्गावर रास्ता रोको.
निरगुडसर-
पिंपरखेड तालुका शिरूर या ठिकाणी बिबट्याने केलेले हल्यात रोहन विलास बोंबे या १३ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रोडेवाडी फाटा पोंदेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी बेल्हा जेजुरी व अष्टविनायक महामार्ग रोखुन धरला.
रात्री सात वाजता या परिसरातील अनेक गावाचे ग्रामस्थ या ठिकाणी जमा झाले व रास्तारोको आंदोलन केले.या परिसरात वाढलेल्या बिबट्याचा उपद्रव आणि त्यामुळे होणारे नागरिकांवरील हल्ले. जनावरंवरील हल्ले याचा उद्रेक झाला.

रोडेवाडी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.जुन्नर आंबेगाव शिरूर आणि खेड या तालुक्यांमध्ये सध्या एक हजार पेक्षा जास्त बिबटे असल्याची माहिती वन विभागाच्या काही अधिकार्यांनी नाव खाजगीत दिली आहे. त्यामुळे या परिसरात प्रत्येक गावात चार ते पाच बिबट्यांची संख्या आहे.बिबट्यांचा वावर वाढला असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रोजच कुठे ना कुठे जनावरण तसेच माणसे यांवर हल्ले होत आहेत.पिंपरखेड जांबुत या ठिकाणी मागील एक महिन्यात तीन व्यक्तींचे मृत्यू झाल्याने परिसरात भिती आहे.त्यामुळे संतप्त नागरिकांनी रोडेवाडीफाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम,दामुआण्णा घोडे, शिवसेना (उबाठा)चे सुरेश भोर, सुभाष पोकळे, शेतकरी संघटनेचे माऊली बोंबे,यांसह परीसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन5 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
