सामाजिक
अष्टविनायक महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी बसवले गतिरोधक
मंचर
अष्टविनायक महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील रोडेवाडी फाटा नजीक गतिरोधक बसवला आहे.
पोंदेवाडी ग्रामस्थांनी रोडेवाडी फाटा नजीक गतिरोधक बसवणे बाबत माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील व जि. प. माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे ख. वि. संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, माऊली रोडे, राजु रोडे, अक्षय रोडे, सुनिल रोडे यांनी सांगितले. रोडेवाडी फाटा नजीक गतिरोधक नसल्याने काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
अष्टविनायक महामार्ग आंबेगाव तालुक्यातुन कारफाटा, नागापूर, पारगाव काठापूर, पोंदेवाडी इत्यादी गावातून जातो हा महामार्ग पुढे रांजणगाव गणपती रांजणगाव औद्योगिक वसाहतीला मिळत असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे सदर रस्त्यावर चारचाकी वहाने भरधाव वेगाने जातात.अशा वेळी सदरील रस्त्याच्या आजुबाजुला असलेल्या गावातील नागरीकांना या रस्त्यावरुन ये-जा करत असताना वाहनांच्या वेगाचा सामना करावा लागतो.
अवजड वाहनांच्या वेगामुळे दुचाकी रस्त्याच्या खाली जावून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्याच प्रमाणे अनेक अपघात झालेअसून अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. सातत्याने अपघाताची मालिका सुरु होती सदर रस्त्यावर गतिरोधक बसल्याने पोंदेवाडी रोडेवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.