गावागावातुन
आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी, राणमळा व पोंदेवाडी येथे लुपिन फाउंडेशन मार्फत 133 शेतकऱ्यांना तुषार संच चे वाटप.
मंचर-
लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन, पुणे व इलिका पी. बी. व्हर्लपुल किचन अप्लायन्सेस प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने " उपजीविका विकासासाठी जल संसाधन प्रकल्प" अंतर्गत लोणी, राणमळा व पोंदेवाडी येथील 133 शेतकऱ्यांना प्रति शेतकरी एक एकर प्रमाणे तुषार सिंचन संच वितरित करण्यात आले.
सध्याच्या दुष्काळ सदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना सदर संच वाटप केल्याने पाण्याचे काटेकोर नियोजन होणार आहे.
गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत लुपिन फाउंडेशन मार्फत आठ सिमेंट बंधारे बांधन्यात आले असून गावातील तीन पाझर तलावातील गाळ काढण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषद शाळा लोणी व उपबाजार समिती मंचर बाजार आवार लोणी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग चे काम करण्यात आले आहे. सदर कामा मुळे भुजल पातळी वाढण्यास मदत मिळाली आहे.
आज तुषार सिंचन वितरण कार्यक्रमात प्रदीप वळसे पाटील व्हाइस चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज रानमळा गावाचे सरपंच राजेंद्र सिनलकर, उपसरपंच संतोष सिनलकर, पोलीस पाटील रुपेश सिनलकर, संतोष सिनलकर पोंदेवाडी गावचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर,अमोल वाळुंज,कुंडलिक पोखरकर,सोमनाथ वाळुंज,संतोष ढोबळे,मच्छिंद्र पोखरकर,आकाश पोखरकर,निलेश मांजरे,संदीप घोलप ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
लुपिन फाउंडेशन चे प्रताप मोटे यांनी सदर तुषार सिंचन च्या माध्यमातून भाजीपाला पिकास पाणी देऊन कमी पाण्यात जास्त उत्पन्न घेण्या बाबत आपले विचार मांडले. फिनोलेक्स चे रोहित कदम व संभाजी कठाळे यांनी तुषार सिंचन संच जोडणी नियोजन व वापर याबाबत मार्गदर्शन केले.
लुपिन फाउंडेशन चे वर्कसाईड हेड व्यंकटेश शेटे व संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम घेण्यात आला. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब बोऱ्हाडे व मच्छिन्द्र खरात हे उपस्थित होते.