गावागावातुन
पारगाव कारखाना पोलीस ठाण्याला उत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्काराने गौरविले.पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रशंसापत्र प्रधान
मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलीस स्टेशनला पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सन २०२५-२०२६ या कालावधीत गुन्हे नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच लोकाभिमुख सेवा या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पारगाव कारखाना पोलीस ठाण्याला उत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ शुभमकुमार यांच्यासह पोलिस दलातील अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते
पारगाव कारखाना पोलीस ठाण्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि सर्व अंमलदार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली झाल्याचे पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी सांगितले.
नागरिकांना चांगली सेवा देणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या कामांचे प्रशस्तिपत्रात विशेष कौतुक करण्यात आले आहे.
या पुरस्कारामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले असून, भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.पोलीस अधिकारी म्हणजे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारा अधिकारी नव्हे, तर समाजातील दुःख समजून घेणारा संवेदनशील माणूसही असतो, हे स.पो.नि. सचिन कांडगे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.