गावागावातुन
महाळुंगे पडवळ येथील ग्रामस्थांच्या लढ्याला यश ग्रामस्थांचे उपोषण स्थगित.
मंचर –
महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील स्टोन क्रशर साठी बनावट NOC व अनधिकृत उत्खनन प्रकरणाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले होते. या आंदोलकांची भेट घेऊन.आंदोलकांच्या मागण्यांबाबत योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे सुरू असलेल्या स्टोन क्रशर साठी बनावट NOC तयार करुन अनधिकृत उत्खनन केले असुन या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी यासाठी येथील ग्रामस्थ संजय घोडेकर, श्रीकांत घोडेकर, किरण डोके, ज्ञानेश्वर बनकर, भगवान बनकर, ज्ञानेश्वर घोडेकर, महादू बनकर, दशरथ बनकर आणि नवनाथ डोके हे उपोषणाला बसले होते.
आंबेगावचे तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी (BDO) प्रमिला वाळुंज, यांनी आंदोलकांची भेट घेऊन सर्व मागण्यांबाबत योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष अजय आवटे व गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.