Public
आळंदी येथे माऊलींच्या पायी वारी सोहळ्यातील अजामेळा दिंडी क्रमांक २६च्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह.
आळंदी –
तीर्थक्षेत्र आळंदी ( ता . खेड ) येथील पुणे जिल्हा मातंग समाज धर्मशाळेत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी सोहळ्यानिमित्त बुधवार दिनांक २ डिसेंबर ते रविवार दिनांक ६ डिसेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होणार असल्याचे अजामेळा दिंडी क्रमांक २६ चे सरचिटणीस व या सप्ताहाचे संयोजक ह भ प पत्रकार मधुकर महाराज गायकवाड यांनी ही माहिती दिली.
या सप्ताहात पहाटे पाच ते सात वाजता काकड आरती भजन सकाळी सात ते नऊ वाजता श्री ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते अकरा वाजता गाथा भजन सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते सात वाजता हरिपाठ व रात्री सात ते नऊ वाजता श्रीहरी कीर्तन व त्यानंतर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहेत या सप्ताहात ह .भ.प.गणेश महाराज हिंगे ( अवसरी बुद्रुक ) ह भ प संभाजी साहेब लोंढे पुणे ह भ प प्राचार्य डॉ . पांडुरंग निवृत्ती महाराज गायकवाड (मंचर ) ,ह भ प श्री पंढरीनाथ तांबे सर ( अवसरी खुर्द ) ह भ प बाळासाहेब लोंढे सर (राजगुरुनगर ) ह .भ . प . नानासाहेब लोंढे सर राजगुरुनगर ह भ प डॉ . हेमलता नंदकुमार सोळवंडे काळेवाडी ( पुणे )ह भ प रवींद्र महाराज कांबळे पुणे यांची प्रवचन रूपाने सेवा होणार आहे तर या सप्ताहात ह . भ . प . संतोष महाराज गावडे आदर्श गाव गावडेवाडी ह भ प दत्तात्रय महाराज रूकारी कोल्हारवाडी ह . भ . प . भीमाताई ज्ञानेश्वर लोंढे संगीत अलंकार (वारू )ता .मावळ
ह भ प तान्हाजी महाराज तांबे शिरदाळे (ता .आंबेगाव ) यांची वारकरी सांप्रदायिक कीर्तन रूपाने ज्ञानदान सेवा होणार आहे.
या सप्ताहाची सांगता या सप्ताहाचे संयोजक ह भ प.मधुकर निवृत्ती महाराज गायकवाड (आदर्श गाव गावडेवाडी )यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून संपन्न होणार आहे .पंचक्रोशीतील भाविकांनी भाविकांनी या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा असे आवाहन
अजामेळा दिंडी क्रमांक २६ चे अधिकारी पदाधिकारी तसेच जिल्हा मातंग समाज धर्मशाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.