गावागावातुन

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे ६५ गरजू महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांची उपस्थिती.

Published

on

. मंचर –

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे ६५ गरजू महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठाणने यांच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला होता.

पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठान पोंदेवाडी यांच्या वतीने जारकरवाडी पंचायत समिती गणातील ६५ गरजू कुटुंबांतील महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते या गिरण्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थ व महिला भगिनींशी संवाद साधला.

सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीठ गिरणी, शिलाई मशीन तसेच विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. या उपक्रमामुळे गरजू महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

यावेळी बोलताना विवेक वळसे पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून पात्र शेतकरी, महिला आणि विद्यार्थिनींना डीबीटीद्वारे विविध वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या जात असल्याचे सांगितले. अशा योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज,आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, पारगाव गणप्रमुख मनोज रोडे पाटील, जारकरवाडी गणप्रमुख बाळशीराम वाळुंज,सतिष रोडे पाटील माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर, आनंदा पोंदे,प्रतिष्ठानचे पदाधिकारी व आयोजक, जारकरवाडी पंचायत समिती गणातील सरपंच, पोंदेवाडी गावचे आजी-माजी सरपंच, महिला भगिनी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version