Public
दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
मंचर –
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक – संचालक व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व भीमाशंकर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवनेरी ब्लड सेंटर, मंचर यांचेमार्फत रक्तदान शिबीर संपन्न झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी दिली.
रक्तदान शिबीराचे उदघाटन कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, स्टोअर किपर अनिल बोंबले, सिव्हिल इंजीनिअर अमीर पठाण, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, भीमाशंकर शिक्षण संस्थेचे ओ.एस.डी. बी.डी. चव्हाण, कार्यालयीन अधिक्षक वसंत जाधव, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य नाथा मोकाटे व शिक्षकवृंद, सेवक वर्ग उपस्थित होते. तसेच शिवनेरी ब्लड सेंटरचे संचालक चंद्रभान वाघ, डॉ. वर्षा शेळके व त्यांचे सहकारी यांनी रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिराला कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षण संस्थेतील शिक्षकवृंद व सेवक वर्ग यांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला. रक्तदान शिबीरामध्ये २०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.