गावागावातुन
खेड्यापाड्यातही आता मोठ्या गणेश मूर्तींची धूम, आंबेगाव तालुक्यात पीओपीसह शाडूच्या मूर्तीना मागणी; तयारी अंतिम टप्प्यात
मंचर-
येत्या काही दिवसानी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी ओबेगाव तालुक्यात शहर व ग्रामीण भागातील कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती साकारण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. कारागीर दिवस-रात्र मेहनत घेऊन मूर्तीना आकर्षक रूप देत असून, यंदा पीओपीसह पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी असल्याचे जिल्ह्याला घाऊक मूर्ती पुरवणारे गावडेवाडी ता आंबेगाव येथील श्रीधर आप्पा राजगुरू व प्रथमेश श्रीधर राजगुरू यांनी सांगितले आहे.
आंबेगाव तालुक्यातील कारखान्यांमध्ये रंगकाम, सजावट आणि वस्त्रांच्या नक्षीकामाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नैसर्गिक रंगांचा वापर आणि पारंपरिक स्वरूपाच्या मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक मंडळांसह नागरिकांनी आगाऊ नोंदणी (बुकिंग) सुरू केली असून, कारागीर ग्राहकांच्या पसंतीनुसार विशेष मूर्ती साकारत आहेत.कारखान्यात गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला असून, सध्या मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे.
आमच्या कारखान्यात सध्या सुमारे तीन हजार मूर्ती तयार असून, त्या सर्व ग्राहकांच्या पसंतीनुसार बनविल्या आहेत. १० ते २५ हजार रुपये किमतीच्या मोठ्या मूर्तीना मंडळांकडून विशेष मागणी आहे. शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी आहे.घरगुती गणेश मूर्तीनाही मोठी मागणी आहे – प्रथमेश श्रीधर राजगुरू
मूर्ति कारागीरगीरआदर्शगाव गावडेवाडी (ता .आंबेगाव )
पीओपी मूर्तीना पसंतीआकर्षक रंगसंगती
कमीवजन आणि परवडणाऱ्या किमतीमुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीना बाजारात मोठी मागणी आहे. प्रशासनाने पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन केले असले तरी, पीओपीच्या मूर्तीची विक्री वाढणार असल्याचा दावा श्रीधर राजगुरू यांनी केला आहे.मात्र कच्च्या मालाचे वाढलेले दर वाढलेली मजुरी यामुळे यावर्षी मूर्ती विक्रीत १५ ते २० टक्यांनी वाढ होणार असल्याचेही श्रीधर राजगुरू सांगतात दुसरीकडे, पर्यावरणप्रेमींकडूनजलप्रदूषणाबाबत चिंताव्यक्त करत शाडूच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन केले जात आहे
आदर्श गाव गावडेवाडी ता आंबेगाव येथील गणेश मूर्ती कारागीर कारखान्यात अखेरचा हात फिरवण्याच्या लगबगीत गुंतले आहेत