महाराष्ट्र
माळशेज घाटामध्ये करांजले गावच्या हद्दीमध्ये रस्ता खचल्याने अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील वाहतूक बंद.
मंचर-
माळशेज घाटामध्ये करांजले गावच्या हद्दीमध्ये रस्ता खचल्याने आळेफाटा कडून कल्याण कडे जाणारी अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून. पुणे व नगर जिल्ह्यातील प्रवाशांनी माळशेज घाटाऐवजी नाशिक मार्गे कसारा घाट किंवा पुणे मुंबई एक्सप्रेस वे ने प्रवास करावा असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथक आळेफाटा चे ए.पी.आय शरद शिंपणे व पी.एस.आय. शिवाजी नऱ्हे यांनी केले आहे.
माळशेज घाटामध्ये करंजाले गावच्या हद्दीमध्ये मुसळधार पावसाने रस्ता खचला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने माळशेज घाटातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली असून. अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील प्रवाशांनी माळशेज घाटातून प्रवास करण्याऐवजी पर्याय महामार्गाचा अवलंब करावा अशे आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाचे ए.पि.आय.शरद शिंपणे यांनी केले आहे.
आळेफाट्यावरून कल्याण मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी कल्याण मुंबईला जाण्यासाठी नाशिक कसारा घाट मार्गे जावे. त्यासाठी आळेफाटा संगमनेर नाशिक कसारा घाट या महामार्गाचा वापर करावा,किंवा आळेफाटा मंचर चाकण लोणावळा मुंबई कल्याण या महामार्गाचा वापर करावा अशे आवाहन पी.एस.आय. शिवाजी नऱ्हे यांनी केले आहे.