देशविदेश
सोनम वांगचूक यांचे आमरण उपोषण सुडले.उपोषण सोडण्यात केंद्र सरकार यशस्वी.
नवी दिल्लीः
मागील काही दिवसांपासून देशभरात NEET पेपर लीक आंदोलन सुरू झाले आहे .या आंदोलनादरम्यान माघील 26 दिवसांपासून सुरू असलेलं सोनम वांगचूक यांचे आमरण उपोषण अखेर सुटले असुन. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपर लीक प्रकरणावर प्रथमच मध्यरात्री व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशात त्यांनी पेपर लीक प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर कायद्याची घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सोनम वांगचूक यांनी उपोषण संपवत असल्याची घोषणा केली. या घटनेमुळे चर्चांना उधाण आले आहे.
वांगचूक यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. चर्चेनंतर सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मोठा पाठिंबा दिला होता.
उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक म्हणाले कि आज केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह, तसेच लेह-लडाखच्या एपेक्स बॉडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मी अखेर 26 दिवसांनंतर माझे उपोषण सोडत आहे.
देशभरातील अनेक खासदारांनी मला उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते.विविध अटींवर चर्चेनंतर आणि देशात संभाव्य हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन. हा निर्णय घेण्यात आला आहे.माझी नम्र विनंती आहे की, देशात कुठेही कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ देऊ नका. सर्वांनी सतर्क राहा आणि शांतता कायम राखा.
वांगचूक यांचे उपोषणान सुटल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे.