Public
काठापूर बुद्रुक येथे वृक्षारोपण.
मंचर-
काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथे श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या माध्यमातून वृक्षारोपण महाअभियान 2026 अंतर्गत प्रत्येक भक्त का एक वृक्ष या संकल्पनेनुसार शंभर वृक्षांचे रोपण करण्यात आले.
रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीज धाम रत्नागिरी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वृक्षारोपण महाअभियान राबवले जात असून, प्रत्येक भक्त का एक वृक्ष या योजनेअंतर्गत प्रत्येक भक्ताच्या माध्यमातून एका झाडाचं रोपण करण्यात येत आहे. काठापुर बुद्रुक या ठिकाणी या योजनेतून शंभर वृक्षांचे रोपन करण्यात आले.
नानिजधाम मुख्य पिठाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ही योजना राबवली जात असून,पारगाव सेवा केंद्राच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सरपंच अशोक करंडे माजी उपसरपंच विशाल करंडे पोलिस पाटील अमोल करंडे,संदीप करंडे, सुषमा करंडे पुष्पा राऊत ,राधाबाई रोडे, विलास मैड सहभागी झाले होते.