गावागावातुन

पोंदेवाडीत शेतकरी बचत गटाला कृषी विभागाच्या वतीने संकरित बाजरीचे बी बियाण्याचे वाटप.

Published

on

मंचर-

पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील शेतकरी बचत गटाला महाराष्ट्र शासन कृषी विभाग घोडेगाव, यांच्या वतीने संकरित हायब्रीड बाजरीचे बी बियाण्याचे वाटप पंचायत समिती सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज यांच्या हस्ते व सहाय्यक कृषी अधिकारी विकास गवई,प्रवीण मिरके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी धामणी पहाडदरा,वाळुंजनगर शिरदाळे,खडकवाडी,लोणी,रानमळा मांदळेवाडी वडगावपीर पोंदेवाडी या गावांमध्ये बाजरीच्या बी बियाण्याचे वाटप करण्यात आले.पोंदेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी आंबेगाव तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले.यावेळी ७५ शेतकऱ्यांना प्रत्येकी दिड किलो याप्रमाणे बाजरी बियाणे देण्यात आले.यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,माजी उपसरपंच संदीप पोखरकर, अमोल वाळुंज, अर्जुन महाराज वाळुंज, आनंदा पोंदे, चंद्रकांत विरकर ,राहुल घोलप, स्वामी घोलप, मंगल जाधव ,पुष्पा लंके यांसह स्थानिक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
नुकताच पूर्व भागामध्ये पावस चांगला झाल्यामुळे, सदर बियाण्यांचे पेरणी अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version