गावागावातुन
पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला.
मंचर –
सध्या पावसाने ओढ दिली असून. मागील अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आज रोडेवाडी पोंदेवाडी लाखनगाव सविंदणे परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असुन पावसाला असंच सर्वत्र वर्षाव व्हावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान रोडेवाडी फाटा पोंदेवाडी लाखनगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून.असाच पाऊस अनेक ठिकाणी पडावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मागे अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पडणारे ऊन.त्याचप्रमाणे जून महिना संपत आला तरीही पाऊस पडत नसल्याने उभी पिके जळु लागली होती. नदी व कालव्याचे पाणी सुद्धा बंद केल्याने शेती संकटात आली होता.
अशा परिस्थितीत पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आज झालेल्या पावसाने रोडेवाडी पोंदेवाडी परिसरात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून असाच जोरदार पाऊस महाराष्ट्रात बरसावा अशी अपेक्षा खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी व्यक्त केली.