गावागावातुन
मांदळेवाडी येथे खंडित होत असलेल्या विजपुरवठा होनार सुरळीत.नविन विज लाईनचे काम सुरू.
.
मंचर-
मांदळेवाडी ता.आंबेगाव येथे गावाला होनारा विजपुरवठा हा शिरुर तालुक्यातुन होत असल्याने तो वारंवार खंडित होत होता.त्यामुळे येथील ग्रामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.यावर उपाय म्हणून या गावाला आता वडगावपीर येथुन विजपुरवठा करण्याचे काम सुरू असुन या कामाची सुरुवात करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून मांदळेवाडी ता.आंबेगाव येथे होनारा विजपुरवठा हा वारंवार खंडित होत होता.आंबेगाव तालुक्यातील या शेवटच्या गावाला शिरुर तालुक्यातुन विद्युत पुरवठा होत होता. परंतु त्या ठिकाणी असणारे लोड शेडिंग हे दररोज संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत होत होते, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ वैतागले होते.या नागरिकांनी बरेच दिवसांपासून मागणी केली होती की आम्हाला विद्युत पुरवठा आंबेगाव तालुक्यातून लोणी उपकेंद्रातून मिळावा.याबाबद स्थानिक ग्रामस्थांनी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज,यांच्याकडे पाठपुरावा करत होते.या मागणीचा विचार करून मांदळेवाडी गावास विद्युत पुरवठा वडगाव पीर या गावापासून मांदळेवाडी पर्यंत नेण्यासाठी जवळपास 50 पोलची विद्युत लाईनमंजुर होऊन या कामाला सुरुवात करण्यात आली.यासाठी अंदाजे 25 लाख रुपयेचा निधी लागणार आहे.या कामाचे भूमिपूजन पंचायत समिती सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज व खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,संविदने गावचे माजी सरपंच वसंत पडवळ, मांदळेवाडी गावच्या सरपंच उज्वला आदक,विजू आदक, बाळशीराम वाळुंज, प्रतिक जाधव पाटील, चेतन पडवळ उपस्थितीत होते.यासाठी रामदास वळसे पाटील यांनी पाठपुरावा केला.त्यामुळे येणाऱ्या आठ ते दहा दिवसात मांदळेवाडी ग्रामस्थांचा विज पुरवठा सुरळीत होनार आहे.स्थानिक ग्रामस्थांना पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा होणार आहे.