गावागावातुन

लाखणगाव येथील पोल्ट्री व्यावसायिक संतोष ज्ञानेश्वर पोंदे यांच्या पोल्ट्रीमधील सुमारे 3600 बॉयलर कोंबड्या अचानक मृत्यु,शेतकऱ्याचे सहा लाख रुपयांचे नुकसान.

Published

on

मंचर-
लाखणगाव, ता. आंबेगाव येथील पोल्ट्री व्यावसायिक संतोष ज्ञानेश्वर पोंदे यांच्या पोल्ट्रीमधील सुमारे 3600 बॉयलर कोंबड्या रात्री अचानक मृत्युमुखी पडल्या सबंधित शेतकऱ्याची सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सदर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

लाखनगाव येथील पोंदेमळ्यातील संतोष पोंदे गेली पंधरा वर्षापासून शेतीला जोड धंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय करत आहे. ते सध्या करार पद्धतीने बॉयलर कोंबड्यांचे संगोपन करतात. त्यांच्या पोल्ट्रीमध्ये एकूण 3700 कोंबड्या होत्या. काल सोमवारी सायंकाळी संतोष पोंदे कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी पोल्ट्री शेडमध्ये गेले असता काही कोंबड्या मेलेल्या आढळल्याने त्यांनी स्थानिक डॉक्टरांना बोलवून उपचार सुरू केले.परंतु पुन्हा मंगळवारी सकाळपर्यंत एकूण 3600 कोंबड्यांचा मृत्यू झाला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. फक्त 100 कोंबड्या जिवंत राहिल्या आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अचानक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने पोंदे यांचे सुमारे सहा ते सात लाख रुपये नुकसान झाले आहे.

हि माहिती कळताच पंचायत समिती सदस्या कु.अंकिता वाळुंज, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व कोतवाल विकास दाभाडे यांनी आज मंगळवारी सकाळी पोल्ट्री शेडला भेट देऊन माहिती घेतली याबाबत अंकिता वाळुंज यांनी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाला तातडीने पंचनामा करण्यासाठी कळवले. तसेच श्री. पोंदे यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी लवकरच माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन माहिती देणार असल्याचे अंकिता वाळुंज यांनी सांगितले.यानंतर डॉ. प्रशांत साळवे, डॉ. वसंतराव वाळुंज, डॉ. संजय पांडे, प्रशांत पिंगळे यांनी आज मंगळवारी सकाळी पोल्ट्री शेडला भेट देऊन पंचनामा केला.

एकूण 3592 कोंबड्यांचा मृत्यू झाला असुन, उष्माघाताने कोंबड्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. काही मृत कोंबड्याच्या शरीरातील अवयव औंध (पुणे) येथील पशुरोग अन्वेषण विभागात तपासणी साठी पाठवले असुन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण समजेल, असे डॉ. प्रशांत साळवे यांनी संगितलले.
सध्या शेतमालाला बाजार भाव नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे त्यातच शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायावर असे संकट आल्याने शेतकरी अधिकच अडणीत आला असल्याचे अनिल वाळुंज यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version