गावागावातुन

लाखनगाव ता. आंबेगाव येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकरी जयसिंग ज्ञानेश्वर रोडे यांच्या गुरांचे शेड पडले.घोडी व गाई मृत्यूच्या दारात. पाच लाख रुपयेचे आर्थिक नुकसान, नुकसान भरपाई मिळावी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांची मागणी.

Published

on

मंचर-

लाखनगाव ता. आंबेगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गव्हाळीमळा येथील शेतकरी जयसिंग ज्ञानेश्वर रोडे यांचे गुरांचे शेड पडल्याने या शेडखाली बांधलेली घोडी व गाईचा मनका मोडला.असुन मृत्यूच्या दारात आहेत.ईतर दोन जनावरे जखमी झाली असुन पाच लाख रुपयेचे आर्थिक नुकसान झाले आहे.या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांनी केली आहे.


आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात काल जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.या परीसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ तयार झाले. व परिसरातील भागात फिरल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.लाखनगाव येथील गव्हाळीमळा येथील शेतकरी जयसिंग ज्ञानेश्वर रोडे यांचे शेड पडले.त्याखाली बांधलेल्या घोडी व गाईचा मनका मोडला.त्यामुळे त्यांचे पाच लाख रुपयेचे आर्थिक नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे स्वामी मारुती जांभळे यांचे घर पडल्याने त्यांचेही पाच लाख रुपयेचे नुकसान झाले आहे.लाखनगाव येथील ईतरही अनेक शेतकऱ्यांची घरे गोठे यांचे नुकसान झाले आहे. फळझाडे यांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पंचनामे सुरू झाले असून ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र शेजुळ हे नुकसान झालेल्या ठिकाणी जाऊन पंचनामे करत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित या ठिकाणी पंचनामे झाल्यावर आर्थिक मदत केली पाहिजे अशी मागणी शेतकरी करत आहेत.


सदर ठिकाणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे देवदत्त निकम, शिवसेनेचे रमेश येवले, अरुण गिरे पंचायत समिती सदस्या अंकिता वाळूंज ,श्वेता ढोबळे पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version