गावागावातुन
आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव ,काठापुर बुद्रुक ,पोंदेवाडी, पारगाव येथे पाऊस व वादळी वाऱ्याने मोठे नुकसान.देवदत्त निकम यांनी केली परीस्थितीची पाहनी.
मंचर-
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखनगाव ,काठापुर बुद्रुक ,पोंदेवाडी, पारगाव या परिसरामध्ये काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारात जोरदार स्वरूपाच्या पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यावेळी जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे. परिसरातील घरांचे, गोठ्यांचे, पोल्ट्री फार्म,पत्रा शेड, फळबागा शेतीपिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून. या परिसराची पाहणी राष्ट्रवादी श.प. जिल्हा अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली.यावेळी प्रशासकीय अधीकारी यांच्याशी चर्चा करुन नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात काल सायंकाळी चार वाजता सोसाट्याचा वारा सुटला त्या सोबत पाऊसही मोठ्या प्रमाणावर पडला. या वाऱ्याचा सर्वाधिक फटका लाखनगाव काठापुर बुद्रुक पोंदेवाडी या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या घरे गोठे पत्र्याचे शेड, पोल्ट्री फार्म यांना बसला. अचानक आलेल्या या वादळाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी झालेल्या नुकसानीबाबत. जिल्हाधिकारी , तहसीलदार,आपत्कालीन विभाग यांच्याशी संपर्क साधला असून सदर नुकसानीची माहिती दिली आहे . सदर नुकसानीबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे निकाल यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे ,राष्ट्रवादीचे तालुक्याचे युवक चे अध्यक्ष विशाल वाबळे, संजय बढेकर.मार्तंड टाव्हरे तीनही गावचे पदाधिकारी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.