गावागावातुन

काठापूर बुद्रुक पोंदेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस शेतकरी सचिन देवराम दौंड यांच्या २०० फुट पोल्ट्री शेडचे नुकसान.

Published

on

मंचर-

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक पोंदेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. या वादळी वारस झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.काठापुर बुद्रुक येथील शेतकरी सचिन देवराम दौंड यांनी काही महिन्यापुर्वी बांधलेली २०० फुट लांबीच्या पोल्ट्रीचे पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
‌या पोल्ट्री मध्ये उद्या कोंबड्यांची पिले येनार होती त्यामुळे शेतकरी दौंड यांनी पूर्ण तयारी केली होती पण अचानक आलेल्या पावसानं सारख आहे उद्ध्वस्त झाले.आता करायचे काय हा प्रश्न शेतकरी दौंड यांच्यापुढे उभा आहे.याआधी दोनच वेळा या पोल्ट्रीशेडमध्ये मध्ये दोनदाच त्यांनी उत्पन्न घेतले होते.


एकंदरीतच सध्या शेती पिकांना बाजार भाव नसल्याने अनेक तरुण हे पोल्ट्री व्यवसायाकडे वळत आहेत परंतु अशा स्वरूपाचे नुकसान झाले तर करायचे काय हा प्रश्नही या शेतकऱ्यांपुढे पडला आहे या ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पंचायत समिती सदस्या अंकिता वाळूंज यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version