गावागावातुन

घोडीवर बिबट्याचा हल्ला हल्यात घोडीचा मृत्यू .मेंढपाळ शिंदे त्यांचे आर्थिक नुकसान.

Published

on

मंचर-

पारगाव (ता.आंबेगाव) येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पुर्व बाजूलाच संतोष बबन ढोबळे यांच्या शेतात मेंढपाळ हे मुक्कामी साठी होते.रात्री ठीक २.३० च्या सुमारास बापू शिंदे व बबन शिंदे यांच्या दीड वर्षाच्या घोडीवर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात घोडीचा जागीच मृत झाला आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी केली आहे.

यावेळी शेतकरी संतोष ढोबळे,बापु शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.मोरगाव सुपा (बारामती) येथील बापू शिंदे आणि बबन शिंदे हे दोघे बंधू असून हे गेल्या अनेक वर्षांपासून पारगाव परिसरात मेंढ्या पालन कररत असुन येथे वास्तव्यास आहेत.सदर ठिकाणी वनरक्षक पुजा कांबळे यांनी भेट देऊन पंचनामा केला असुन मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version