गावागावातुन

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान ,नुकसानग्रस्त गावांना माजी मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील यांची भेट, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन.

Published

on


मंचर-

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना काल पावसाने झोडपले अनेक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पावस झाला.त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.कृषी व महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


यावेळी आंबेगावचे प्रभारी तहसीलदार सचिन वाघ, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज,स.पो.नी.सचिन कांडगे, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, बाजार समिती सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, अजय आवटे, महेंद्र वाळूंज व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

  यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, पूर्व आंबेगावत  काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असून संबंधित यंत्रणेने तातडीने पंचनामे करून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा.

शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version