गावागावातुन

थापलिंग यात्रेत जिलेबी भजीचा आस्वाद घेण्यासाठी यात्रेकरूंची गर्दी.महिलांनी संसारपयोगी तर शेतकऱ्यांनी शेतीपयोगी वस्तूंची केली खरेदी.

Published

on

पारगाव:

नागापूर (ता. आंबेगाव )येथील श्री. क्षेत्र थापलिंग गडावर रविवारी भर यात्रेच्या दिवशी तब्बल दोन लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. यात्रेकरूंनी यात्रेत जिलेबी भजी खाण्याचा आस्वाद घेतला.
उत्तर पुणे जिल्ह्यात थापलिंग यात्रा सर्वात मोठी भरते. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच भाविकांनी गडावर मोठी गर्दी केली होती. थापलिंग यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे जिलेबी भजी. मित्रमंडळी, पाहुण्यांना जिलेबी- भजी आग्रहाने खाऊ घातले जाते. दोन्हीही दिवस जिलेबी- भजी खाण्यासाठी अक्षरक्ष: झुंबड उडालेली पाहायला मिळाली. यंदा जिलेबी २०० रुपये किलो तर भजी २८० रुपये किलो दराने विकले जात होते. अशी माहिती शिवजन्मभूमी हॉटेलचे राजू हलवाई यांनी दिली.
थापलिंग यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे महिला गृहिणींसाठी संसारपयोगी साहित्य, वस्तू या यात्रेत मोठ्या प्रमाणावर मिळतात. शेतकऱ्यांसाठी शेती कामासाठी लागणारी खोरे ,टिकाव, कुदळ, खुरपे आदी सर्व अवजारे, हत्यारे याच यात्रेत मिळतात. त्यामुळे शेतकरी, गृहिणींसाठी यात्रा मोठी पर्वणी असते. अनेक शेतकऱ्यांनी, गृहिणींनी संसारपयोगी साहित्य शेती उपयोगी हत्यारे खरेदी केली.

नागापूर (ता.आंबेगाव) येथील थापलिंग यात्रेत जिलेबी भजीचा आस्वाद येताना यात्रेकरू. दुसऱ्या छायाचित्रात संसारपयोगी साहित्य खरेदी करताना महिला गृहीनी, दुसऱ्या छायाचित्रात शेतीपयोगी अवजारे, हत्यारे खरेदी करताना शेतकरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version