गावागावातुन
थापलिंग यात्रेत धावले नवसाचे बैलगाडे.टोकन पद्धतीने ४५० बैलगाड्यांची झाली नोंदणी.
पारगाव :
पौष पौर्णिमेनिमित्त नागापूर (ता.आंबेगाव) श्री क्षेत्र थापलिंग गडावर पहिल्या दिवशी नवसाचे दोनशे बैलगाडे धावले.रविवारी भर यात्रेच्या दिवशी उर्वरित गाडे धावणार असल्याची माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.
थापलिंग यात्रेच्या दोनही दिवस नवसाचे बैलगाडे पळवले जातात. ही जुनी परंपरा आहे. या यात्रेत बैलगाडा मालकांना कोणताही इनाम ,बक्षीस दिले जात नाही. बैलगाडा मालक केवळ श्रद्धेपोटी नवसपूर्तीसाठी बैलगाडे पळवतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे बैलगाडे टोकन पद्धतीने घाटात पळवले जातात. यंदा दोन्ही दिवसांसाठी सुमारे ४५० बैलगाडा मालकांनी नोंदणी केली आहे. पैकी पहिल्या दिवशी २०० बैलगाडे घाटात सोडण्यात आले. थापलिंग यात्रेत नवसाचे बैलगाडे पाहण्यासाठी बैलगाडा शौकीन मोठी गर्दी करत असतात.
बैलगाडा घाटात श्री थापलींग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम बैलगाडा मालक, शौकीन, यात्रेकरूंचे स्वागत करत आहे.
धावत्या बैलगाड्यांचे समालोचन जिल्ह्यातील नामवंत समालोचक करत आहेत.
नागापूर (ता.आंबेगाव) येथील थापलिंग यात्रेत नवसाचे बैलगाडे पळविण्यात आले.