मनोरंजन

काठापुर बुद्रुक येथे पिरसाहेब यात्रा उत्सवाच्या निमित्त भव्य बैलगाडी छकडी शर्यतींचे आयोजन.०५/१०/२०२५ रोजी होणार स्पर्धा. प्रथम क्रमांकाला १२१००० रुपयांचे बक्षीस.

Published

on

निरगुडसर-

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे पिरसाहेब यात्रा उत्सवाच्या निमित्त भव्य बैलगाडी छकडी शर्यतींचे आयोजन केले असून.०५/१०/२०२५ रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत या स्पर्धा पार पडणार असून यासाठी प्रथम क्रमांकाला १२१००० रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्ण भागातील काठापुर बुद्रुक या ठिकाणी पिरसाहेब यात्रे निमित्त बैलगाडी छकडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून.आंबेगाव तालुक्यात प्रथमच छकडी स्पर्धा होणार असून. यासाठी काठापूर बुद्रुक या ठिकाणी मारुती देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवर भव्य मैदान तयार करण्यात आले असून. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या सहाशे बैलगाडी मालकांना संधी दिली जाणार आहे.असे आयोजन कमिटीने सांगितले.काठापुर बुद्रुक येथील पिरसाहेब यात्रा उत्सव यावर्षी उत्साहात साजरा केला जात असून. या ठिकाणी प्रथम छकडी बैलगाडी स्पर्धांचे आयोजन केले आहे.


काठापूर बुद्रुक येथील शेतकरी पिंटुशेठ पोखरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समस्त ग्रामस्थ काठापुर बुद्रुक,हनुमंत जाधव,कमलेश ढोरे,काठपुर बैलगाडा संघटना व ग्रामस्थांच्या सहकार्याने हि यात्रा पार पडणार आहे.या शर्यतींना मोठ्या प्रमाणे गर्दी होणार असून. त्या दृष्टीने तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती आयोजन कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. दिनांक ०४/१०/२०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत टोकन स्वीकारले जाणार असून त्यानंतर टोकन नंबर,गट नंबर,फाटी क्रमांक काढण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version