महाराष्ट्र

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा २६ वा बॉयलर प्रदिपण आणि मोळी पूजन समारंभ संपन्न.

Published

on

मंचर-

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचारी आणि आपल्या सहकाऱ्याने गाळप करुन देशात सर्वच बाबतीत एक नंबर कारखाना येण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांनी केले.
पारगाव ता.आंबेगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा २६ वा बॉयलर प्रदिपण सोहळा आणि मोळी पूजन समारंभ संपन्न झाला या वेळी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, पूर्वा वळसे, तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, माजी आमदार पोपटराव गावडे,, मानसिंग भैय्या पाचुंदकर, लाला बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, प्रकाश बापू पवार ,सर्व संचालक, शेतकरी , विविध तालुक्यातील संत महंत आणि हभप उपस्थित होते.

   या वेळी होम हवन करून बॉयलर प्रदीपन करण्यात आले . उपस्थित  मान्यवरांचे हस्ते गव्हाणीत मोळी टाकून उद्घाटन करण्यात आले.या वेळी दिलीप वळसे पाटील बोलत होते. ऊसाचे बेणे वेळोवेळी बदलणे, ठिबक सिंचन अथवा ड्रिप वर ऊसाचे उत्पादन घेणे , ए आय तंत्रज्ञानाचा वापर करणे या गोष्टींचा अंगीकार शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन या वेळी वळसे पाटील यांनी केले. साखर कारखाना जर सक्षमतेने एकशे साठ दिवस चालला तरच ऊस कारखाने तग धरू शकतील अन्यथा नाही. गेल्या वर्षी अनेक कारखाने एकशे साठ दिवस चालू शकले नाहीत. चालू वर्षी कारखान्याचा डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला जाणार आहे. इथेनॉलचे दर वाढीसाठी आम्ही राज्यसरकार केंद्रसरकर कडे प्रयत्न करत आहोत. कमी क्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसे घेता येईल असा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा . हेक्टरी ऊस उत्पादन वाढले तर आपल्याला बाहेरील ऊसाच्या वाहतूक खर्चात बचत होईल.

ऊस कांदा अशा उत्पादनाचे भाव राज्यसरकार ठरवत नाहीत तर ते केंद्र सरकार ठरवत असते हे उत्पादकाने लक्षात घ्यावे.या पुढील काळात ऊस तोडणी कामगार मिळणे अवघड होणार आहे. तरुणांनी पुढाकार घेऊन हार्वेस्टर खरेदी करावी . पुणे जिल्हा बँक हार्वेस्टर खरेदी साठी कर्ज द्यायला तयार आहे. कारखाना हार्वेस्टर खरेदीसाठी पाच वर्षाकरिता बिनव्याजी पस्तीस लाख रुपये मदत देईल. लातूर मध्ये विलासराव देशमुख यांचे बंधू मांजरा सहकारी साखर कारखाना शंभर टक्के ऊस हार्वेस्टर च्या सहाय्याने ऊस तोडणी करत आहे. पावसानं राज्यात झालेल्या नुकसान आणि नुकसान ग्रस्त नागरिकांना आपण जास्तीत जास्त मदत करावी .कारखाना सुद्धा मदत करणार आहे.असे वळसे पाटील म्हणाले.

या वेळी विविध तालुक्यातील संत महंत ह भ प यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील यांनी केले तर आभार उपाध्यक्ष ॲड प्रदीप वळसे पाटील यांनी केले.सूत्र संचालन निलेश पडवळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version