सामाजिक
पहाडदरा ठाकरवाडीतील कडाळे कुटूंबाला मदतीचा ओघ.
लोणी धामणी-
पहाडदरा ( ता. आंबेगाव ) येथील ठाकरवाडी येथे नुकतेच पावसामुळे बबन कडाळे यांचे घर कोसळले. घरामध्ये कडाळे यांचा मुलगा, सुन व तीन लहान मुले होती या घटनेत रवींद्र कडाळे, आरती कडाळे ही जखमी झाले आहेत सदर घटनेची माहिती समजताच लोक प्रतिनिधीनी पहाडदरा येथील कडाळे कुटुंबीयांना भेट देऊन कुटुंबाच्या उपजीविकेसाठी मदत केली.
आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, उद्योजक संदीप पोखरकर यांनी घर उभारणीसाठी लागणारे 61 हजार रु चे साहित्य, उद्योजक रमेश येवले यांनी पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत.तसेच बी जे पी चे तालुका पुर्व विभाग अध्यक्ष किरण वाळुंज यांच्या माध्यमातून 31 हजार रु च्या जीवनावशक्य वस्तू ,तसेच भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष भगवान बेंडे यांनी दहा हजार रु, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तालुका अध्यक्षा पूजा वळसे यांच्याकडून किराणा देण्यात आला.
या वेळी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सर्वोपातरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. खरेदी विक्री संघांचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव उंडे ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, पहाडदरा सरपंच मछिंद्र वाघ,सोसायटी चेअरमन जयदीप वीर, शिवसेना शाखाप्रमुख संदेश कुरकुटे, निलेश वळसे,संकेत वायकर, प्रतीक जाधव, शुभम चांगण, गोपाळ रोडे सर, संदीप घोलप,भाऊसाहेब करंडे, उपतालुका प्रमुख महेश वाघ,धामणीचे उपसरपंच अक्षय विधाटे,माजी सरपंच सागर जाधव, पोलीस पाटील सागर भालेराव व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.