सामाजिक
क्रांतिवीर मंडळाचे समाजोपयोगी कार्य आदर्शवत- एपीआय महादेव शेलार
नारायणगाव-संकेत गांजवे
भोरवाडी तालुका जुन्नर येथील समाजोपयोगी उपक्रमात नेहमी अग्रेसर असणाऱ्या क्रांतिवीर मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित मातोश्री स्व.श्रीमती शैला शामशेठ दहितुले यांच्या स्मरणार्थ “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेनुसार वृक्षारोपण व गावातील महिलांना फळझाडे रोपे वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी गणपतीची महाआरती संतोष भालेराव व निलेश शिंदे यांच्या हनुमान सेवा मंडळ, बोरी खुर्द साळवाडी च्या ढोल पथकाच्या वादनात एपीआय महादेव शेलार, जुन्नर पोलीस स्टेशनचे पीएसआय रघुनाथ शिंदे, वनविभागाचे शिवनेर भूषण मेजर रमेश खरमाळे, बाजार समिती संचालक माऊली खंडागळे, अखिल भारतीय मराठा महासंघ जुन्नर तालुका महिला अध्यक्षा शोभा पाचपुते यांच्या शुभ हस्ते पार पडली.
तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित महिलांना विविध प्रकारच्या फळझाडांचे वाटप करण्यात आले; मंडळाचे अध्यक्ष महेश भोर, उपाध्यक्ष कृष्णा भोर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला; मंडळाच्या कार्याचा आणि गणेशोत्सव काळात राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करून एपीआय महादेव शेलार यांनी डॉल्बी व गुलाल मुक्त विसर्जन मिरवणूक काढण्याचे आव्हान करताच सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणूक काढण्याचे जाहीर केले; जुन्नर पोलीस स्टेशनचे पीएसआय रघुनाथ शिंदे यांनी भोरवाडीमधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत मंडळाच्या स्थापना काळापासूनच्या राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या, शिवनेर भूषण मेजर रमेश खरमाळे यांनी एक पेड माँ के नाम संकल्पनेची प्रशंसा करून सामाजिक कार्यकर्ते सागर दहितुले यांनी मंडळामार्फत राबविलेल्या अनेक उपक्रमांची माहिती घेवून झाडे लावण्याचे आव्हान करून त्याचे महत्त्व विशद करून जास्तीत जास्त झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा आणि निरोगी आयुष्य जगा असे आव्हान उपस्थितांना केले,
शिवसेना (उबाठागट) तालुकाप्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे संचालक माऊली खंडागळे यांनीही मातोश्री स्व. शैला दहितुले यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून, महिलांना दिलेल्या रोपांचे जतन करावे व प्रत्येकाने किमान एक तरी झाड आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ लावावे जेणेकरून ते त्या रूपाने त्यांच्या आठवणी आपल्याजवळ राहतील असे भावनिक आव्हान केले, बिरोबा महाराज पतसंस्थेचे चेअरमन सचिन निलख यांनी उपस्थितांचे स्वागत करून मंडळाच्या कार्याची माहिती विशद करून मंडळाच्या कार्याच्या जोरावर यावर्षी देण्यात येणारा आदर्श गणपती मंडळ पुरस्कार क्रांतिवीर मंडळाला देण्यात यावा असे आवाहन पोलीस प्रशासनाला केले, याप्रसंगी नारायणगाव आणि जुन्नर पोलीस स्टेशनचे अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी, उद्योजक वैभव काळे, सचिन निलख, सुनील पवार, दत्तात्रय भोर, माऊली निलख, सुनीता भोर, खंडू भोर, रोहिदास भोर, मामावडे भोर, क्रांतिवीर महिला ग्रुपच्या अपर्णा दहितुले, वैशाली शिंदे, पुनम पाचपुते, छाया पाचपुते, अंकिता भोर, अनिता भोर, पल्लवी भोर, रुपाली पाचपुते, रेश्मा भोर, उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर पटाडे सर आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले; कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरोबा महाराज पतसंस्था उपाध्यक्ष देविदास भोर तर आभार मंडळाचे खजिनदार गणेश शिंदे यांनी केले.