सामाजिक

आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील गावांमध्ये श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा.

Published

on

निरगुडसर-

आंबेगाव तालुक्याच्या अनेक गावांमध्ये श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. बैलपोळ्याच्या निमित्त बैलांना धुवून त्यांच्या शिंगाना रंग लावून सजवुन मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर महिलांनी औक्षण करुन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलपोळा सण साजरा करण्यात आला.

आंबेगाव तालुक्याच्या अनेक गावांमध्ये श्रावणी बैलपोळा साजरा केला जातो. तालुक्याचे पुर्व भागातील काठापूर ,शिंगवे या गावांमध्ये श्रावण बैलपोळा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा बैलपोळा महाळुंगे पडवळ या ठिकाणी साजरा होतो. आज तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बैलांना सकाळी स्वच्छ धुवून त्यांच्या शेंगांना रंग लावून गावातुन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकिनंतर महिलांची औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला.

बैल हा शेतकर्याचा मित्र सहकारी म्हणून सर्वत्र बैलपोळा सण हा परंपरेने वर्षानुवर्षे साजरा केला जातो.सध्या शेतीमध्ये बैलांचा वापर कमी झाला आहे त्यामुळे बैलाचे प्रमाण कमी झाले आहे.तरीही बैलगाड्याच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये बैल चांगल्या पद्धतीने सांभाळले जातात. शेती कामासाठी असणार्या बैलांची संख्या गावोगावी कमी झाली आहे. परंतु बैलगाड्याच्या शर्यतीसाठी बैल मोठ्या प्रमाणावर सांभाळले जात असल्याने बैलांची संख्या वाढली आहे.
मध्यंतरी बैलगाडा शर्यत बंदिच्या काळात बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. परंतु मागील तीन ते चार वर्षात बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानंतर पुन्हा बैलांची संख्या चांगल्या पद्धतीने वाढली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात बैलगाडा प्रेमींची संस्था मोठी असल्याने अनेक गावांमध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा केला जातो.काठापुर बुद्रुक या ठिकाणीही बैलपोळा सण उत्साहात साजरा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version